तिवसा तालुक्यातील ५ सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीचा बिगुल वाजणार…

तिवसा तालुक्यातील ५ सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीचा बिगुल वाजणार…

 

MB-NEWS (सुनिल घोडमारे, प्रतिनिधी) :-तिवसा तालुक्यातील महत्वाचे मानल्या जाणाऱ्या सेवा सहकारी संस्थाची निवडणूक होणार असून आज तात्पुरती मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. होऊ घातलेल्या तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी मध्ये कुऱ्हा सेवा सहकारी संस्था र.नं.९७७,बोर्डा सेवा सहकारी संस्था र.नं.११२४,शिवणगाव सेवा सहकारी संस्था र.नं.९९०,तळेगाव ठाकूर सेवा सहकारी संस्था र.नं.१०१६,पालवाडी सहकारी संस्था र.नं.१०४८ यांचा समावेश आहे. दिनांक १६ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीवर हरकती,आक्षेप स्वीकारणे १६ ते २३ जानेवारी.आक्षेप व हरकती यावर निर्णय २३ ते ३० जानेवारी पर्यंत तर त्याच दिवशी ३० जानेवारीला अंतिम निर्णय होणार आहे.राजकीय दृष्ट्या महत्वाचे मान्यल्या जाणाऱ्या गावातील सेवा सहकारी संस्था च्या निवडणूक होऊ घातली आहे.गावातील सहकार क्षेत्रातील राजकीय मंडळी गावात आपले प्राबल्य असल्याचे दाखवण्यासाठी तयारीला लागले असल्याचे दिसत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे