कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनच्या दरात मोठी घसरण
कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे दर सहाशे रुपयांनी खाली आला आहे. त्यामुळे आता साेयबीनला चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलने विकले जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचे दरही खाली आले असून, कापूस सात हजार पाचशे ते आठ हजार दोनशे प्रतिक्विंटलने विक्री होत आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत
केंद्र आणि राज्यात असलेले सरकार हे व्यापाऱ्यांचे सरकार असून मागील वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन उपलब्ध असतानाही सरकारने मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात केले होते.तसेच कापसाच्या संदर्भात घेतलेले काही चुकीचे निर्णय यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी देशोधडीला लागत आहेत – असा आरोप राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांनी केला आहे

