आज शेतकरी अन्नत्याग आंदोलनाचा -अद्याप ही तोंडगा नाही ….तहसीलदारांची विंनती शेतकऱ्यांनी फेटाळली.तालुक्यातील शेतकरी आक्रमक-आंदोलन चिघळणार
MB-NEWS (आशिष देशमुख):-तालुक्यातील वरखेड मंडळ नुकसान भरपाई पासून वंचित ठेवल्याने गेल्या तीन दिवसा पासून तिवसा तहसील कार्यालया समोर शेतकऱ्यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु असून आज चौथा दिवस उगवला असून अद्याप ही प्रशासना कडून कोणताही तोडगा निघालेला नाही. काल तहसीलदार यांनी उपोषण मंडपाला भेट दिली असून शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्या संदर्भात विनंती केली.परंतु तालुका प्रशासना कडून जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या अहवाला नुसार माहे जून-जुलै मध्ये वरखेड मंडळमध्ये कुठल्याही प्रकारची अतिवृष्टी झाली असल्याचे नमूद नसून तर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये झालेला परतीच्या सततधार पावसा मुळे वरखेड मंडळात जिरायत कापूस,सोयाबीन,तुर उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३% पेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे नमूद आहे.त्यामुळे वरखेड मंडळातील शेतकऱ्यांना आद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळू न शकल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तहसीलदार यांची आंदोलन मागे घेण्याची विनंती फेटाळून लावली.
तर आंदोलन करते आपल्या भूमिकेवर ठाम असून मागे न हटण्याचा निर्धार शेतकऱ्यानी यावेळी व्यक्त केला असून यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांन मध्ये चांगलाच असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कुठल्याक्षणी तालुक्यातील शेतकरी पेटून उठण्याची शक्यता आहे.
खरिपातील अतिवृष्टीमुळे वरखेड महसूल मंडळातील ८६३९ नुकसानग्रस्त शेतकरी संख्या असून १०,५६७ हेक्टर बाधित क्षेत्र आहे.या नुकसानाची भरपाई करण्यासाठी १०,५१,८२,४०० रुपयाची मागणी करण्यात आली आहे.गेल्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांनी या मागणी साठी प्रशासनास विविध निवेदने व आंदलोने करून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.परंतु प्रशासनाने वेळोवेळी आश्वासने देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला असून.
या अन्नत्याग आंदोलनात २३ शेतकऱ्याचा सहभाग आहे या मध्ये विलास हांडे मुकुंद पूनसे दीपक पावडे (देशमुख) भारवाडी दिपकराव बोके वरखेड नामदेवराव तांबे निभोरा किशोरभाऊ गोरडे निभोरा रवीभाऊ राऊत दापोरी शेषरावजी कापसे काटसुर अंकुश दिवाकर बोके वरखेड बबनराव पूनसे हैबतराव गाडगे मोहन गोरडे निंभोरा संदीप थोटे ममदापूर निवृत्ती मोकद्दम फत्तेपूर दिलीपराव टिकले राजेंद्र मढावी सरपंच धामंत्री गुणवंतराव ढोरे रुपेश तालन निभोरा सुधीर लवनकर ममदापूर गिरधरराव घुरडे निंभोरा दिनेश ढगे ज्ञानेश्वरराव तालन निभोरा अमोल डाखोरे ममदापूर
गेल्या चार दिवसा पासून तिवसा तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये माझ्या वरखेड मंडळ मधील शेतकऱ्यांचे आपल्या हक्कासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू असून. प्रशासनाने याची तातडीने दखल घेवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
सौ.रोशनी मुकुंद पूनसे उप सभापती प.स.तिवसा
अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ ही अन्नदात्यवर आली याला केवळ जबाबदार हे तालुका प्रशासन आहे,अतिवृष्टी झाली तेव्हा प्रत्येक्षात अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतः पाहणी केली. मात्र यंत्राचा तांत्रिक बिघाळ सांगत शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे.त्यामुळे प्रशासनाने या कडे गांभीऱ्यांने लक्ष द्यावे.अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू.
अंकुश दिवाकरराव बोके शेतकरी वरखेड
अतिवृष्टी झाली नाही असे सांगत कृषी अधिकारी यांनी या मंडळावर जणू काही आघातच केला.त्या मुळेच शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकली नसल्याने आम्ही गेल्या चार त्यांचा निषेध करत हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
नामदेव तांबे शेतकरी निभोंरा दे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी असून शेतकऱ्यांच्या अनिश्चित परिस्थितीमध्ये बळ देणारी ठरणार आहे असा शासनाचा दावा असला तरी.प्रत्यक्षात तो फोल ठरला आहे.तो शेतकऱ्याच्या हिताचा नसून निव्वळ विमा कंपनीच्या हिताचा आहे जोपर्यंत पिक विम्याचा परतावा व अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तो पर्यंत आमचा लढा सुरूच राहील.
विलास हांडे शेतकरी चांदुरढोरे
गेल्या चार दिवसा पासून या ठिकाणी आमचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही.मुख्यमंत्री,कृषी यांनी दखल घ्यावी.अन्यथा भविष्यात कृषि तसेच पालकमंत्र्यांना जिल्ह्यामध्ये शेतकरी फिरू देणार नाही.
निवृत्ती मोकद्दम शेतकरी फत्तेपूर

