तिवसा येथे रमाई यांची 125वी जयंती उत्साहात साजरी संबोधी बुद्धजण संघाचे आयोजन..

तिवसा येथे रमाई यांची 125वी जयंती उत्साहात साजरी संबोधी बुद्धजण संघाचे आयोजन..

MB-NEWS तिवसा (ता.प्र.):-शहरातील श्रीजीत मंगल कार्यालयात संबोधी बुद्धजण संघाच्या वतीने रमाईबाई आंबेडकर यांची 125वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनासह गीत गायन,संस्कृती कार्यक्रम घेत जयंती साजरी करण्यात आली,या कार्यक्रमाला तालुक्यातील हजारो बौद्ध उपासक,उपासिका उपस्थिती होत्या.

बाबासाहेब आंबेडकर यांना समाजाच्या उद्धारात शेवटपर्यंत साथ दिली,त्या त्यागमूर्ती रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचे भव्य असे आयोजन करत 125व्या जन्मोत्सवा निमित्याने पाच सत्रामध्ये जयंती साजरी करण्यात आली,या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अमरावतीचे तहसीलदार अनिल भटकर,व प्रमुख म्हणून तिवसा तहसीलदार वैभव फरतारे,गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव,धम्मप्रेरक नागभद्र धम्मचारी,सिनेट सदस्य डॉ. रविंद्र मुन्द्रे, प्रा.सिमा मोरे,उमेदचे दिनेश ढोके,कु. एकता घोडेस्वार,या कार्यक्रमाची सुरवात मिलिंद खाकसे व त्यांच्या संच्याने रमाई गीताने केली,
यावेळी चिमुकल्यांनी समुह नृत्य व महिलांनी भिम गीत,रमाई गित गीत गायिले तर महिला महासंघ स्थापन करून गाव पातळीवर समतासखी म्हणून अनेक महिलांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमात तालुक्यातील बौद्ध उपासक,उपासिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती या कार्यक्रमासाठी माता रमाई महीला महासंघ व संबोधी बुद्धजन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना धावणे, प्रास्ताविक निलेश जवंजाळ तर आभारप्रदर्शन चंद्रशेखर रामटेके यांनी केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे