प्रशासनाने घेतली दखल – अन्नत्याग आंदोलन तुर्तास मागे.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलकांचाआत्मदहनाचा इशारा.
MB-NEWS सुनिल घोरमाडे तिवसा(ता.प्र.):-गेल्या चार दिवसांपासून वरखेड महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.अखेर गुरुवारी सकाळी उपविभागीय अधिकारी डॉ नितीन व्यव्हारे यांनी आंदोलकांना नुकसान भरपाई बाबत आश्वासित केले.व आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.यावेळी तहसिलदार वैभव फरतारे,तालूका कृषी अधिकारी अनिल कांबळे व काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बेमुदत अन्नत्याग आंदोलनात एकुण तेविस शेतकरी सहभागी झाले होते.त्यापैकी चार जणांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.प्रशासनाविरोधात आक्रमक झालेल्या आंदोलकांनी आंदोलन तीव्र करण्याची रणनीती आखली होती.याची चाहूल प्रशासनाला लागताच जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार उपविभागीय अधिकारी यांनी आधीच शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.परंतु शेतकऱ्यांनी तटस्थ भुमिका घेतल्यामुळे तोडगा निघु शकला नाही.अखेर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल.त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा झाली असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलकांना सांगितले.तेव्हा जर अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत तोडगा निघाला नाही तर शेतकरी आत्मदहनाचा पवित्रा उचलणार असल्याचा गंभीर इशारा आंदोलकांकडुन देण्यात आला.व तुर्तास या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.
येथील आंदोलनामुळे जिल्ह्यातील मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल.कारण वरिष्ठ पातळीवर या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे.
डॉ.नितीन व्यव्हारे, उपविभागीय अधिकारी.
उपविभागीय अधिकारी यांनी आश्ववासित केल्यामुळे आम्ही तुर्तास हे आंदोलन स्थगित केले.परंतु पुन्हा शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला तर याच ठिकाणी आम्ही आत्मदहन करणार यात शंकाच नाही.आंदोलक:-(मुकुंद पुनसे)
विम्याची सुद्धा मिळणार मदत.तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन कापूस तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.परंतु ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या पैकी काही शेतकऱ्यांना जास्त तर काही शेतकऱ्यांना अतिअल्प मदत मिळाली होती.तर काही शेतकऱ्यांना मदतच मिळाली नव्हती त्या मुळे पीकविमा कंपनीविरोधात शेतकरी आक्रमक झाले होते.या वेळी कृषि अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा विमा प्रतीनिधी सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मार्च अखेरेस समान मदत दिले जाणार असेल्याचे आश्र्वाशित केले.
*शेतकरी संकटात…अधिका-यांची* *कुरघोडी*
गेल्या चार दिवसांपासून प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.यामधे प्रशासनातील जबाबदार अधिकारी आंदोलकांचा रोष अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करीत होते.अतिवृष्टीच्या नुकसानाचे पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून संयुक्तपणे करण्यात आले होते. त्यामुळे यावेळी महसूल विरुद्ध कृषी असा सामना रंगला होता.कृषी अधिका-यांच्या अनुपस्थित आंदोलकांचे कृषी विभागाबाबत कानं भरण्यात आले होते.व कृषी अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊच नये यासाठी प्रयत्न केल्या जात होते.परंतु मंगळवारी सायंकाळी कृषी अधिकारी आंदोलकांच्या मंडपात आले व अतिवृष्टीबाबत त्यांनी केलेल्या कामांचा पाढाच त्यांनी आंदोलकांसमोर वाचला.तेव्हा शासकीय मदत न मिळण्याला कोण कारणीभूत आहे हे शेतकऱ्यांच्या चांगलेच लक्षात आले.व जबाबदार अधिकारीही एकमेकांवर कुरघोडी करून आपली चुक कशी लपवितात याची कुजबुज मात्र आंदोलनस्थळी बराच वेळ चर्चेत राहिली.

