पाळीव प्राण्यांचा वाघापासून सरंक्षण करीता तातडीने उपाय योजना करा..
आ.राजकुमार पटेल यांनी मुख्य वनसंरक्षक अधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कार्यालय अमरावती ला केले आह्वान…
अक्षय अथोटे
मेळघाट चिखलदरा( प्रतिनिधी):-
मेळघाट क्षेत्रातील धारणी तालुक्यातील अनेक गाव परिसरातील नागरीकांना, शेती करीता ये-जा करणाऱ्या शेतकन्यांना व पाळीव प्राण्यांचा वाघापासून सरंक्षण करीता तातडीने उपाय योजना करणे बाबत. उपरोक्त विषयाचे अनुषंगाने धारणी तालुक्यातील मौजा हातिदा, बिजुधावडी व मोगर्दा येथे दि. 14/02/2023 रोजी रात्रीचा वेळेस गाव परिसरात वाघाने प्रवेश करून अनेक नागरीकांचा पाळीव प्राण्यांवर हल्ला करून जीवे मारले आहे. मोजा हातिदार येथे रात्री 8.00 चा दरम्यान गावठानात एका बैलावर वाघाने हल्ला केला तसेच त्यांना रात्री 10.00 चा सुमारास मौजा बिजुधावडी येथे झगुजी पाटील यांचा शेतात वगारवर हल्ला करून जीवे मारले. त्यानंतर त्याच रात्री मौजा मोगर्दा येथे 1.00 वाजता शिवचरण सुरजलाल कोयलेकर यांच्या शेतात गायीचा बछडयावर हल्ला करून जीवे मारले. एकाच रात्री तीन गावातील पाळीव प्राणी वाघाचा हल्ल्यामुळे दगावली असून तेथील नागरीकांचा जीवाला देखील धोका निर्माण झालेला आहे. अशाच प्रकारे 4 ते 5 दिवसा अगोदर मोजा घोटा, बोथरा व चित्री येथील गावातील नागरीकांचा पाळीव प्राण्यांवर वाघाने हल्ला करून अनेक जनावरांना जीवे मारले होते. सदर घटना घडल्यानंतर अजुनपर्यंत वन विभागाकडून कुठलीही सकारात्मक (टळक) कार्यवाही झालेली नाही.
अशाप्रकारे वनविभागाचा हलगर्जीपणामुळे 2019 साली धारणी तालुक्यातील दादरा येथे एका माणसाला ई-वन वाघीनीचा हल्ल्यामुळे जीव गमवावे लागले होते. तशाच प्रकारे आताही वाघाचा हल्ल्यामुळे नागरीकांना जीव गमवावे लागणार ही शक्यता नाकारता येत नाही. अनेक गावातील नागरीकांचा वनविभागाचा विरोधात आमदार राजकुमार पटेल यांचाकडे तक्रारी प्राप्त होत असून नागरीकांमध्ये वनविभागावर रोष निर्माण झालेला आहे. करीता तातडीने उपाययोजना करण्यात यावी अन्यथा यापुढे आपल्या हलगर्जीपणामुळे कोणत्याही नागरीकास तथा पाळीव प्राण्यास वाघाचा हल्ल्यामुळे जीव गमवावे लागले तर त्यास मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे सर्व अधिकारी जवाबदार राहतील असे स्पष्ट केले. तसेच समोर कोणतेही अनोचित घडल्यास मी वन विभागाला सहकार्य करनार नाहीं असे विडीओ द्वारे आमदार राजकुमार पटेल यांनी म्हटले.

