चांदूर रेल्वेच्या तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात

चांदूर रेल्वेच्या तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात

▪️*आलोसे* – *कैलाश शंकर पुरी,* वय-५७ वर्ष, धंदा -नोकरी, अव्वल कारकून, तहसिल कार्यालय चांदुर रेल्वे ता.चांदुर रेल्वे अमरावती
वर्ग – 3

रा.घर न.७८, समर्थ मंदिराजवळ, मिराछांगणी नगर, धामणगाव रेल्वे अमरावती

▪️*लाच मागणी रक्कम*
400 /-रुपये

▪️ *स्वीकारली रक्कम*
300/-रुपये

▪️*पडताळणी* –
दि. 16/02/2023,

▪️*सापळा* –
दि. 16/02/2023

▪️**घटना स्थळ* -अभिलेख कक्ष, तहसिल कार्यालय,  चांदुर रेल्वे, अमरावती.

▪️*कारण*- यातील तक्रारदार यांनी जुने दस्तांचे साक्षांकित प्रती मिळणेकरिता, तहसील कार्यालय चांदुर रेल्वे येथे लेखी अर्ज केला होता, त्या अर्जासोबत रीतसर फी सुद्धा भरली होती व दि.07/02/2023 रोजी तक्रारदार हे यातील आलोसे श्री पुरी यांना दस्तांचे प्रती मागणी करिता भेटले असता, त्यांना आलोसे श्री.पुरी यांनी दस्तांचे प्रती देणेकरिता 400/- रु. ची मागणी केली. अशी लेखी तक्रार आज दि.16/02/2023 रोजी दिली.

सदर तक्रारीवरून दीं.16/2/2023 रोजी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष आलोसे श्री. पुरी यांनी 400/- रू ची लाचेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली वरून आयोजित सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे श्री पुरी यांनी पंचासमक्ष 300/- रु.लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले.  त्यावरून त्यांचेविरुद्ध पोलीस स्टेशन, चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती  ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे