श्री क्षेत्र टाकरखेडा,येथे १३९ वा.श्री.समर्थ लहानुजी महाराज जयंती महोत्सवला सुरवात…
MB-NEWS (सुनिल घोरमाडे) प्रतिनिधी:- घोरमाडेश्री.समर्थ लहानुजी महाराज जयंती महोत्सव श्री क्षेत्र टाकरखेडा .दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.दिनांंक १४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२३ पर्यंत साजरा करण्यात येतो.संस्थे मार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येते.समुदायिक ध्यान रामधून व गावातून ग्रामफेरी काढण्यात येते.श्री लिलामृत ग्रंथ पारायण केल्या जाते.भजनाचा कार्यक्रम केल्या जातो.संगीतमय भागवत प्रवचन केल्याजाते.कीर्तन,भजन,प्रवचन,साग्रसंगीत कार्यक्रम केल्या जातो.संस्थानच्या योजना:शासवत अन्नदान योजना,गुरुदक्षिणा,गोसेवा.संस्थानचे उपक्रम:गॅस उर्जा निर्मित,सेंद्रिय शेती,एम.एस. स्वामीनाथन शेतकरी प्रशिक्षण शाळा.अल्पदारात सांस्कृतिक केंद्र,मंगल कार्यालय उपलध केल्या जाते.धर्मार्थ दवाखाना,निराधारांना आश्रय,स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र.संस्थानचे उत्पादणे:गांडूळखत,सेंद्रिय भाजीपाला,अमृतजल,सेंद्रिय हळद,कीटकनाशक(गोमूत्रपासून). सेंद्रिय ज्वारी,अमृतजल इत्यादी उपक्रम केल्या जाते.संस्थे मार्फत शाश्वत अन्नदान योजना सुद्धा केल्या जाते.

