एसटी ने ट्रक ला धडक दिली,पिंपळविहीर येथे घटना घडली
MB-NEWS:-सुनिल घोरमाडे (तिवसा प्रतिनिधी):– शहरातील नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळविहीर ते सावरडी येथे मंगळवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास एसटी ने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात एसटी मधले प्रवाशी जखमी झाले. त्यांना इरविन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. जवळपास 32 किरकोळ जखमी प्रवाशी उपचारासाठी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.सुद्दावाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. अशी माहिती नांदगाव पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली. प्राप्त माहितीनुसार नागपूर ते आकोट मार्ग जाणारी एम.एच.40 ऐक्यू 6433 क्रमांकच्या एसटी ने पिंपळविहीर ते सावर्दी या मार्गांवर समोर असलेल्या ट्रक ला मागून धडक दिली. त्यामुळे यातील बहुतांश प्रवाशी हे जखमी झाले आहे. या एसटी मध्ये 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. या घटने नंतर परिसरातील नागरिकांनी अपघात स्थळी एकच गर्दी केली.यावेळी नांदगाव पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन सर्व जखमीना रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालय प्रशासन कडून प्राप्त माहिती नुसार जवळपास 32 प्रवाशी जखमी झाले आहे. हे सर्व प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे.या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयात भेट देऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौन्दले यांच्याकडून माहिती घेत, जखमीची भेट घेत त्यांची विचारपूस केली.

