पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा,तिवसा कॉग्रेस व पत्रकार संघटनेची मागणी
MB-NEWS तिवसा (सुनिल घोरमाडे ता. प्र.) येथील सकाळचे तालुका प्रतिनिधी प्रशिक मकेश्वर यांच्या घरात घुसून आरोपीच्या कुटुंबातील लोकांनी मारहाण करत हल्ल्या केल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार संघटना व काँग्रेसच्या वतीने आरोपी विरुद्ध कठोर कारवाई तसेच शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित राहावा या अनुषंगाने निवेदन देण्यात आले.
तिवसा येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रशिक मकेश्वर यांच्यावर तिवसा शहरातील काही गावगुंडांच्या कुटुंबियांकडून आज सोमवारी सकाळी 9:30वाजताच्या दरम्यान राहत्या घरी हल्ला चढविला. यावेळी घरी कुटुंबासमवेत असलेल्या प्रशिक मकेश्वर यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे सर्वत्र असंतोषाची लाट उसळली असून अनेक पत्रकार बांधव, संघटना निषेध व्यक्त करीत आहे.
तिवसा पोलीस स्टेशनंला गुन्हा दाखल झालेल्या घटनेची बातमी केल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याने पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत आरोपींवर तत्काळ अटक करावी तसेच प्रशिक मकेश्वर यांच्यावर केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष सतीश पारधी, दिलीप काळबांडे, नगराध्यक्ष योगेश वानखडे,नगरसेवक वैभव वानखडे, माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने,शेतू देशमुख,किसन मुंदाने,रितेश पांडव, दिवाकर भुरभुरे,प्रणव गौरखेडे,धीरज ठाकरे,जसबीर ठाकूर,संजय चौधरी यासह मराठी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत निखाडे, संदीप राऊत, राज माहोरे, राहुल येरने, जयंत निखाडे,तुषार राउतकर,अंकुश बोके,नंदकिशोर मते,प्रफुल मकेश्वर उपस्थित होते,यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करत निवेदन देण्यात आले तालुका अध्यक्ष नंदू वानखडे, संदीप दहाट, सिद्धार्थ मुन्द्रे उपस्थित होते.

