पोलिस पाटलांच्या रिक्त जागा लवकरच भरणार व मानधन वाढणार :-उपमुख्यमंत्री…

पोलिस पाटलांच्या रिक्त जागा लवकरच भरणार व मानधन वाढणार :-उपमुख्यमंत्री…

 

▪️ पोलिस पाटलांच्या रिक्त जागा भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्या संदर्भात सकारात्मक आहे. यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, ‘ ” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत शुक्रवारी दिली. राज्यातील पोलिस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना फडणवीस बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

▪️ या बाबत बोलतांना फडणवीस म्हणाले, की पोलिस पाटलांचे मानधन अनेक देवेंद्र फडणवीस वर्षे तीन हजार रुपये होते. ते २०१९ मध्ये वाढवून साडेसहा हजार रुपये करण्यात आले आहे. यामध्ये जास्त वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. आम पोलिस पाटील अधिनियम सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल. तसेच पोलिस पाटलांच्या विविध समस्या सोडविण्यात येतील. पोलिस पाटील यांच्या नियुक्तीच्यानूतनीकरणासाठी आवश्यक दाखले यांची पूर्तता करतानाच ही प्रक्रिया वेळेत व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

 ▪️नूतनीकरणाचा कालावधी हा दहा वर्षाचा केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांची बैठक व्यवस्था व्हावी यासाठी कार्यवाही करण्यात ये कोरोनाकाळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलिस पाटलांच्या कुटुंबीयांना सानुग्रह साहाय्य देण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करून पात्र पोलिस पाटलांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे