तिवसा येथील पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करा..चांदूर रेल्वे येथील सर्व पत्रकार एक येऊन दिले निवेदन…
तसेच खोटा विनयभंगाचा गुन्हा त्वरीत खारीज करा
जिल्हाधिकारी व ग्रामिण पोलीस अधिक्षकांना पाठविले निवेदन
MB-NEWS( चांदूर रेल्वे) -:तिवसा येथील पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करा तसेच मकेश्वर यांच्यावरील खोटा विनयभंगाचा गुन्हा त्वरीत खारीज करा अशा मागणीचे निवेदन चांदूर रेल्वे येथील अ. भा. ग्रा. पत्रकार संघ व स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व ग्रामिण पोलीस अधिक्षकांना पाठविण्यात आले.
तिवसा येथील प्रशिक प्रकाशराव मकेश्वर हे एका वर्तमानपत्रात तिवसा तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. बातमीदार म्हणून त्यांना तालुक्यातील घडलेल्या घटनेच्या बातम्या पाठवाव्या लागतात. अशीच तिवसा शहरातील पानटपरीवरील मारहाणीची व तिवसा पोलिस स्टेशनला नोंद झालेली घटनेची बातमी त्यांनी वर्तमानपत्रात छापली. या कारणावरून तिवसा येथील तीन महिलांनी प्रशिक मकेश्वर यांच्या घरात घुसून भावाची बातमी का छापली. या कारणावरून अश्लिल शिवीगाळ करून त्यांच्यावर हल्ला केला आणि ३५४ मध्ये फसवितो अशी धमकी दिली. या प्रकरणी प्रशिक मकेश्वर यांनी तिवसा पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दिल्यानंतर आरोपी महिलांनी त्यांच्यावर उलट विनयभंगाचा खोटी तक्रार केली. प्रिंट व इलेक्ट्रानिक्स मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. अश्या प्रकारे पत्रकारांवर हल्ले करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे मनोबल खच्चीकरणाचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे आरोपींविरूध्द पत्रकार संरक्षण कायदा २०१९ अन्वये कार्यवाही करण्यात यावी व पत्रकाराच्या घरी घुसून त्यांच्यावर हल्ला करणार्यांना त्वरीत अटक करण्यात यावी आणि पत्रकार मकेश्वर विरूध्द खोटा विनयभंगाचा गुन्हा त्वरीत खारीज करण्यात यावा अशी मागणी केली असुन अन्यथा सर्व पत्रकारमंडळी संपूर्ण महाराष्ट्रात तिव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे. सदरचे निवेदन तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना तसेच ठाणेदार यांच्यामार्फत ग्रामिण पोलीस अधिक्षक यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी चांदुर रेल्वे शहरातील पत्रकार उत्तमराव गावंडे, युसुफ खान, प्रा. रवींद्र मेंढे, बाळासाहेब सोरगिवकर, शहजाद खान, राहूल देशमुख, राजीव शिवणकर, अमोल गवळी, इरफान पठाण, धिरज नेवारे, मनिष खुणे, प्रशांत सिसोदीया, विनय गोटेफोडे,विवेक राऊत, निशिकांत देशमुख, प्रा. सुधीर तायडे, रितेश मुंधडा, पियुष ठोंबरे, बंडू आठवले, प्रविण शर्मा, राजेश सराफी, अभिजीत तिवारी, मंगेश बोबडे इत्यादी पत्रकार निवेदन देते वेळी उपस्थित होते.

