तिवसा शहरातील पत्रकार यांचावर हल्ला करणाऱ्यास कडक कार्यवाही करीता प्रहार चा निषेध..
MB-NEWS (शहर प्रतिनिधि) नंदकिशोर मते :-तिवसा शहरातील सकाळ या वर्तमानपत्रा चे पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्यावर काही दिवसापूर्वी हल्ला झाला होता.
पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ आहे तो अबाधित रहावा,मजबूत रहावा हीच प्रहार पक्षाची अपेक्षा आहे. पत्रकारांच्या लेखनीतून समाजाचे दुःख ,पीडा समोर येत असते ,,समाजाला दिशा देण्याचे काम देखील पत्रकारांच्या निपक्ष लेखणीतूनच केले जाते.
पत्रकार हा निडर,निपक्ष असला पाहिजे हे मत प्रहार चे आहे. जर कुणी पत्रकारांवर हल्ले करीत असतील तर प्रहार पत्रकारांच्या सदैव पाठीशी राहील.
आज या हल्ल्याच्या निषेधार्थ तिवसा प्रहार च्या वतीने तिवसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या वेळेस संजय देशमुख, योगेश लोखंडे,सुरेंद्र भिवगडे,आशिष बांबल,मनोज काळमेघ,प्रशांत राऊत,मोहन आवारे, भूषण गाढे,गजू कडू,प्रवीण केने,अंकुश गायकवाड,कपिल उमप,मुरली मदनकर,समीर लांडगे,इत्यादी उपस्थित होते.

