पत्रकार प्रशिक मकेश्वर वरील खोटा गुन्हा तात्काळ रद्द करा…तिवसा तालुक्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांची मागणी..

पत्रकार प्रशिक मकेश्वर वरील खोटा गुन्हा तात्काळ रद्द करा…तिवसा तालुक्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांची मागणी..

 

MB-NEWS तिवसा शहर प्रतिनिधी(नंदकिशोर मते ):-
पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्या विरोधात खोट्या तक्रारी वरून दाखल करण्यात आलेला 354 चा गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी तिवसा तालुक्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तिवसा पोलीस निरीक्षक व तिवसा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे..

१२ मार्च २०२३ रोजी तिवसा शहरात एका आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकाने पानटपरी उघडली होती. त्याला काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केली. यासंदर्भात दैनिक सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी प्रशिक मकेश्वर यांच्यासह इतर वृत्तपत्रांनीही सविस्तर बातमी दिली. संबंधित युवकाला कुणी मारहाण केली, कशासाठी मारहाण झाली, सध्या काय सुरू आहे याचा बातम्यांमध्ये उल्लेख करण्यात आला होता. या घटनेचे वृत्तांकन करणा-या प्रशिक मकेश्वर यांनाच गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाण करण्यात आली,व मकेश्वर यांची खोटी तक्रार केल्याने पोलीस प्रशासनाने पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्या विरोधातच 354 सारखा गंभिर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हा सदर गुन्हा तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी तिवसा तालुक्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यानी केली आहे.

निवेदन सादर करतेवेळी सागर भवते, संदेश मेश्राम, ऍड. विकास तुरकाने, संदीप बारमासे, सतीश कांबळे, सचिन जोगे, राजकुमार असोडे, गजानन असोडे, मिलिंद खाकसे, राहुल मुंद्रे, सुशील तंतरपाळे, किरण खाकसे, विनोद खाकसे, जगदीश चतुर, हर्षल दहाट, जनार्दन ठाकरे उपस्थित होते.

विनाचौकशी गुन्हे दाखल करू नये..

पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्यावर खोट्या तक्रारीच्या आधारे पोलीस प्रशासनाने गंभीर गुन्हा दाखल केला आहे.. अशाच घटना मागील काळात घडल्या आहेत तेव्हा अशा गंभीर गुन्ह्यामुळे तरुणांचे आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे विनाचौकशी तरुण कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नयेत अशी मागणी आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने सागर भवते, संदेश मेश्राम, ऍड विकास तुरकाने यांनी पोलीस निरीक्षकांशी चर्चेदरम्यान केली..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे