सरपंचांचे मागण्यांसह जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन तिवसा तालुका सरपंच संघटना आक्रमक
MB-NEWS (तिवसा )ता.प्र.नंदकिशोर मतेः -तिवसा तालुक्यातील सरपंच विविध समस्यांचे निवेदन घेऊन मा जिल्हाधिकारी पवणीत कौर व मा मुख्य कार्यकारी अधिकारी अविषांत पांडा यांचेशी चर्चा करून निवेदन सादर केले यामधे प्रामुख्याने गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला गाव स्तरावर होत असलेल्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण चे फलकावर राजकीय सूडबुद्धीने सरपंच उपसरपंच यांना डावलून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नावे घेतली जातात या निमित्ताने संबधित तंत्रने कडून एक प्रकारे अपमानच केल्या जातो गाव खोड्यात हा चर्चेचा विषय ठरतो परिणामी गावात असंतोष निर्माण केला जातो यापुढे असे प्रकार घडल्यास अशा कार्यक्रमावर बहिष्कार टाकून निषेध केला जाईल अशी संतप्त भूमिका सरपंचांनी मांडली यावर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक विचार ठेवत रास्त मागणी असून याबाबत समंधित यंत्रणांची कानउघडणी करत योग्य त्या सूचना देण्यात येईल असे आश्वासन दिले *पंचायत समिती तिवसा येथे सरपंचांना दालन का नाही* ?.. या मागणीबाबत गेल्या अनेक दिवसांची मागणी पंचायत समिती कडे केली असून याकडे दुर्लक्ष केले जाते आहे सोबतच जिल्हा परिषद मधे सुध्दा सरपंच दालन असावे असे सुचविले असता या बाबत लवकरच कार्यवाही केली जाईल असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले
*पंचायत समिती स्तरावर त्रिमासिक सरपंच सभा नियमित घेण्यात यावी* शासनाचे निर्देश असून ही त्रीमासिक सरपंच सभा बाबत उदासीनता दिसून येते पंचायत समिती स्तरावर ही सभा नियमित घेऊन सरपंच समस्या , विविध योजनांची माहिती या व इतर बाबीसाठी अशा सभेचे आयोजन करण्यात यावे तसेच *रो ह यो* मजुरांची ऑनलाईन पद्धतीने *तांत्रिक अडचणी* येतात त्यावेळी हजेरी न लागल्यास मजुरांचे नुकसान होते पर्यायी मजूर कामावर येत नाही अशा वेळी ऑफलाईन हजेरी लावली जावी जेणे करून रो ह यो ची कामे नियमित सुरू राहिल अशा अनेक समस्यांचा पाढा वाचत संघटनेने निवेदन सादर केले. *मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्यास मागे पुढे पाहणार नाही असा इशारा ही यावेळी देण्यात आला* .
यावेळी सरपंच संघटना अध्यक्ष सौ मयुरी सचिन राऊत , सुरेंद्र भिवगडे, दिनेश भाऊ लांडगे ,राहुल तायडे,आशिष बांबल, भूषण घाटे , कांचन शिंदे ,प्रियंका चव्हाण ,नीलिमा समरीत,रीना ताई मंजू ,रुपाली राऊत ,प्रणाली गोरे बादल पाळेकर, प्रमोद बोराळकर , वीकिल वानखडे माजी सरपंच सचिनभाऊ राऊत या सह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

