भरधाव अनियंत्रित ट्रकने राष्टीय महामार्गावरील दुचाकी नेली फरफटत गुरुकुंज मोझरी येथील घटना…
MB-NEWS(गुरुकुंज मोझरी)सुनिल घोरमाडे –:राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव नागपूच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ने, गुरुकुंज मोझरी राष्टीय महामार्गालगत असलेल्या भवानी बिकानेर दुकानाजवळील उभ्या असलेल्या दोन दुचाकीला धडक देत काही अंतरावर फरफटत नेल्याची घटना(रविवारी उशीरा रात्री १०, वाजताच्या सुमारास घडली आहे, – – राष्ट्रीय महामार्गावरून रविवारी रात्री १०,वाजताच्या सुमारास भरधाव ट्रक चालकाचे अचानक संतुलन बिघडल्याने त्याने राष्ट्रीय महामार्गालगत उभ्या असलेल्या दोन दुचाकीस जोरदार धडक दिली व काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने, सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे, – – – – – अमरावतीहुन नागपूर कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ४०, ६९७९ या ट्रकने गुरुकुंजातील भवानी बिकानेर स्वीट मार्ट, या दुकानालगत उभ्या असलेल्या एम एच,१८, ८९०९, व एम एच, २९, बी, आर, ६००२ या क्रमांकाच्या दोन दुचाकीस भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली, सदर घटनेत दैव बलवत्तर मनुन खरेदीसाठी आलेला दुचाकी चालक, हा राष्टीय महामार्गालगत असलेल्या जागेत आपली दुचाकी उभी करून, स्वीट मार्ट येथील दुकानात खरेदी करीता गेला होता, तेवढ्या उशीरात ही घटना घडली आहे, – – गुरुमिन सिंग,असे ट्रक चालकाचे नाव असून तो हिमानी कानपूर, उतराखंड, येथील असल्याचे समजते सदर घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, सदर घटनेचा पंचनामा करून उशीरा रात्री ट्रक चालक गुरुमीन सिंग याला ताब्यात घेतले आहे घडलेल्या अपघातात ट्रक चालकाने दुचाकी वाहन राष्टीय महामार्गावरून काही अंतरापर्यन्त फरफटत नेल्याने यात दोन्ही दुचाकी वाहन क्षितिग्रस्त झाले.
यासंदर्भात दुचाकी वाहन चालकानी पोलीस स्टेशन तिवसा येथे ट्रक चालकाविरुद्ध कुठलीही तक्रार दिली नसल्याने सदर प्रकरण कुठलीही कारवाई न करता आपसात मिटविल्याचे समजते, – – – -गुरुकुंज मोझरी राष्ट्रीय महामार्गालगत रहदारीच्या रस्त्यावर अनेक अनेक व्यावसायिक प्रतिष्टाणे आहेत व नागरिकांची नेहमीच वर्दळ या ठिकाणी असते अश्यावेळी भरधाव येणाऱ्या वाहनांपासून नागरीकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते, त्यामुळ अबाल वृद्धांसह शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश ऐरणीवर आला आहे, रात्रींच्या वेळी महामार्गालगत असलेले अस्थाव्यस्थ पार्किंग येथे नित्याचाच विषय झाला असून भविष्यात येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही

