दहावी-बारावीचे निकाल वेळेतच…
महाराष्ट्रातील बातमीपत्र (पुणे):-दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपली आहे. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. त्यातच परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होत असल्याचे समजते.
बारावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या सप्ताहामध्ये तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी दहावीची तर 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.

