भरधाव ट्रक राष्ट्रीय महामार्गावर उलटला,गुरुकुंज मोझरी नजीकची घटना…..
MB-NEWS तिवसा,सुनिल घोरमाडे (ग्रा.प्र.) :-नागपूरकडून संभाजीनगर (औरंगाबाद) दिशेने जात असलेल्या भरधाव आयसर ट्रकच्या चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. व अश्यातच . भरधाव ट्रक अमरावती नागपूर-राष्ट्रीय महामार्गाच्या विरुद्ध दिशेने जाऊन उलटला, हा अपघात अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे ४ वाजताच्या सुमारास झाला असून. एम. एच २० सि टी ४२९३ क्रमांकाचा आयसर ट्रक नागपूरकडून संभाजीनगर (औरंगाबाद)च्या दिशेने मेडिकल व कुरीयरचे साहित्य घेऊन जात असतांना .
अश्यातच ट्रक चालकाला अचानक झोपेची डुलकी आल्याने – – वाहनचालकाचे वाहनावर नियंत्रण सुटले व भरधाव ट्रक राष्ट्रीय महामार्गाच्या विरुद्ध दिशेने जाऊन उलटला ही घटना गुरुकुंज मोझरी येथील, वाडेकर नॅशनल स्कूल नजीक घडली असून सदर अपघातात ट्रक चालक राम पडवाल,(खामगाव) हा किरकोळ जखमी झाला आहे. घटनेत महामार्गावरील ट्रकच्या समोरील भाग क्षितिग्रस्त झाला असून, सदर घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून यात दोषी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास तिवसा पोलीस करीत आहे.

