गुरुकुंज मोझरी येथील मातोश्री विमलताई वाडेकर बालगृहात सुसंस्कार शिबीराचे उद्घाटन संपन्न

गुरुकुंज मोझरी येथील मातोश्री विमलताई वाडेकर बालगृहात सुसंस्कार शिबीराचे उद्घाटन संपन्न

MB-NEWS तिवसा (ता.प्र.)नंदकिशोर मते: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ गुरुकुंज मोझरी या संस्थेअंतर्गत भजन, टाळ , हार्मोनियम, तबला, खंजिरी व सुसंस्कार प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ मातोश्री विमलताई वाडेकर बालगृह गुरुकुंज मोझरी येथे सुसंस्कार शिबीराचा उद्घाटन सोहळा सपन्न झाला. यावेळी मोझरी ग्रामचे सरपंच सुरेंद्रजी भिवगडे, ग्रामपंचायत सदस्य, मिलिंद काळमेघ, माजी सरपंच श्री पांडुरंग मक्रमपूरे , संस्थेचे सचिव डॉ. रघुनाथजी वाडेकर , गायक श्री अरुण ठवकर, विनोद पेठे, सुमित चव्हाण यासह इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

२१ दिवस पर्यंत चालणाऱ्या या संस्कार शिबिरात टाळ, तबला, हार्मोनियम, खंजिरी व भजन याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून या निमित्त सामुदायिक ध्यान , सामुदायिक प्रार्थना तसेच मान्यवरांचे प्रबोधनाद्वारा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर संस्थेच्या माध्यमातून मातोश्री विमलताई वाडेकर बालगृह तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज छात्रालय हे निवासी वस्तीगृह चालविल्या जाते यामध्ये अनेक विद्यार्थी प्रवेशित असून सदर विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळावे म्हणून हा नावीन्यपूर्ण उपक्रम संस्थेने राबविला आहे .यापूर्वी कोरोना काळापूर्वी सुद्धा सदरचा उपक्रम संस्थेने राबवीला होता. या शिबिराला परिसरातील अनेक मान्यवर भेट देणार असून ते विद्यार्थ्यांशी हितगुज साधून त्यांना संबोधित करणार आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे