मुख्यमंत्री व सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा… वंचित बहुजन आघाडीची मागणी

मुख्यमंत्री व सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा…वंचित बहुजन आघाडीची मागणी

MB-NEWS (तिवसा) ता.प्र.नंदकिशोर मते:-पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आलेल्या 13 श्री, सदस्याचा उष्मघाताने मुत्यु झाला त्याचबरोबर अनेक श्री,सदस्यांची प्रकृती खालावली आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. असे निवेदन पोलीस स्टेशन तिवसा येथे देण्यात आले. नवी मुंबई मधील खारघर मध्ये 16 तारखेला आप्पा साहेब धर्माधिकारी यांना एक भव्य सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने श्री,सेवक जमा झाले होते.
या कार्यक्रमला सांस्कृतिक मंत्रालायचा विरोध असतानाही मुखमंत्री श्री,एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम शासकीय असून देखील भव्य करण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि इतर नेत्यांना बोलावून या कार्यक्रमला राजकीय आणि धार्मिक स्वरूप देण्यात आले त्या मागे राजकीय फायदा घेण्याचा उद्धेश होता.

परंतु हा कार्यक्रम भर उन्हात दुपारी उघड्यावर घेण्यात आल्या मुळे 13 श्री,सेवकांचा उष्मघाततामुळे मुत्यु झाला आणि 18 श्री सेवक अत्यवस्थ मध्ये आहे.
करीत वंचित बहुजन आघाडी शहर व तालुका तिवसा यांची मागणी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अठ्ठासमुळे केलेल्या चुकीचा नियोजनामुळे 13 श्री, सेवकांचा मुत्यु झाला त्या मुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्र सरकार यांचा वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करणात आली.

यावेळी तालुका अध्यक्ष नंदकुमार वानखडे शहर अध्यक्ष संदीप दाहाट तालुका महासचिव सम्यक हगवणे अनिल सोनोने सिद्धार्थ मुंद्रे आशिष मेश्राम अनिल गाडगे किर्तीकुमार दवाळे अर्जित मकेश्वर रोहित गवई मनीष मोहोरे विकास मुंद्रे सुरज भाकरे व कार्यकते उपस्थित होते.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा शासकीय असून तो राजकीय व धार्मिक हेतू मुळे हा कार्यक्रम सार्वजनिक करण्यात आला. या मुळे 13 श्री, सेवकांना जीव गमावला लागला असून यामुळे मुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकार यांचावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात येत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे