घुईखेड येथे भीम गीतांचा प्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन

घुईखेड येथे भीम गीतांचा प्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन

MB-NEWS(धिरज नेवारे)घुईखेड :-सिद्धार्थ बौद्ध विहार बहुउद्देशीय स्मारक समिती द्वारा आयोजित महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम प्रित्यर्थ सुप्रसिद्ध गायक व प्रबोधनकार आकाश राज मनोज गोसावी आणि संच नागपूर यांचा भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बौद्ध मूर्ती भूखंड क्रमांक 35 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

           या कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक डांगे माजी उपमहाप्रबंधक बी एस एन एल अमरावती प्रमुख आमंत्रित वर्ष लता हेमंत जाधव सरपंच ग्रामपंचायत घुईखेड, हेमंत चौधरी ठाणेदार पोलीस स्टेशन तळेगाव दशासर प्रमुख अतिथी माधव नकोशे नाशिक, प्राध्यापक रामचंद्र वरघट, प्राध्यापक श्रीकांत वानखडे मुंबई, प्रमुख उपस्थिती पुंडलिक वरघट, दिगंबर डांगे, भीमराव वानखडे, रमेश गायकवाड, प्रकाश डांगे, सुरेश डांगे, जगदीश गायकवाड, नमोप्रकाश राऊत, सुधाकर वानखडे, संजय उके, राजू वरघट, निरंजन राऊत, गणेश वरघट, चंद्रमणी उके, महादेव बडगे, विशेष निमंत्रित प्रवीण घुईखेडकर माजी जिल्हा परिषद सदस्य, आशुतोष गुल्हाने माजी तालुका अध्यक्ष भाजपा, अनिल वानखडे उपसरपंच, घुईखेड, अमीर भाई, नंदकिशोर काकडे, शेख रफिक, शेख मोनु, शेखर कडुकार, धर्मराज वरघट, अशोक मोहोड, प्रेमचंद अंबादे, सूचक भगत, मीनेश शिंदे, धीरज नेवारे, निशू जैस्वाल हे असून या कार्यक्रमाचे आयोजन अनिल आर वरघट अध्यक्ष सिद्धार्थ बुद्ध विहार स्मारक समिती यांनी केले आहे

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे