गट साधन केंद्राचा सहभाग घेऊन,कायदेविषयक कार्यशाळेत शिक्षणावर चर्चा विधी न्याय विभागाचे आयोजन…

गट साधन केंद्राचा सहभाग घेऊन,कायदेविषयक कार्यशाळेत शिक्षणावर चर्चा विधी न्याय विभागाचे आयोजन…

 

चांदुर रेल्वे :– स्थानिक तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्यातर्फे आयोजित कायदेविषयक कार्यशाळेत शिक्षणाचा मूलभूत अधिकार या विषयावर चर्चा करण्यात आली, स्थानिक गटसाधन केंद्र येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याची शिक्षण व्यवस्था आणि शिक्षणाचा मूलभूत आधार, याविषयावर विषय तज्ञ श्रीनाथ वानखडे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले न्यायालयाचे न्यायाधीश
एस एस म्हातारमारे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ अमीन बेलसरे, ऍड अहफाज राराणी, ऍड एल एम कदम, न्यायालयाचे एस आर वाकडे, दर्शन देशमुख, आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य विषयक बाबीवर डॉ बेलसरे यांनी मार्गदर्शन केले तर न्यायाधीश म्हातारमारे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार विषयतज्ञ विवेक राउत यांनी केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे