आ. सौ.सुलभाताई खोडके यांनी लावला मूलभूत सुविधांच्या विकास कामांचा धडाका

आ. सौ.सुलभाताई खोडके यांनी लावला मूलभूत सुविधांच्या विकास कामांचा धडाका

देवी रेसिडेन्सी, शेगांव व शिवनेरी नगरात आले विकासाचे पर्व
पायाभुत सुविधांमधून नागरीकांचे जीवनमान उंचावण्यास प्राधान्य- आ.सौ. सुलभाताई खोडके

महाराष्ट्रातील बातमीपत्र (अमरावती)  :-शहरीकरणाचा वाढता विस्तार लक्षात घेता,प्रत्येक प्रभागात पायाभूत सुविधांची पूर्तता होणे आवश्यक आहे. याकरिता अधिकाधिक निधी उपलब्ध करून आणण्यासह स्थानिकांना अभिप्रेत असलेला विकास कार्यक्रम राबविण्यावर आपला भर आहे. अंतर्गत रस्ते,पेयजल सुविधा उपलब्धता,परिसरातील उद्यानांची नियमितपणे देखभाल, स्वच्छ व सुंदर परिसराकरिता दैनंदिन साफसफाई, जनसामान्यांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत.यासोबतच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाली बांधकाम, पथदिवे उपलब्धता आदीसहित अन्य बाबी लक्षात घेता, पायाभुत सुविधांमधून नागरीकांचे जीवनमान उंचावण्यास आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केले .

बुधवार दिनांक २६ एप्रिल २०२३ रोजी आमदार महोदयांनी विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजनाचा धडाकाच लावला सुलभाताई असून या शृंखलेत मूलभूत सोयी सुविधांच्या विकासकामांसाठी विशेष अनुदान अंतर्गत रुपये २६.३६ लक्ष निधीतून निर्माण करण्यात आलेल्या देवी रेसिडेन्सी येथील साई सागर अपार्टमेंट समोरील प्रभाग क्रमांक-१ स्थित गल्ली क्रमांक १ ते ४ येथील रोडचे आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तदनंतर शेगाव स्थित मनपा शाळेच्या लगतच्या परिसरात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत रुपये १५ लक्ष निधीतून शेगाव येथिल अंतर्गत नालीचे बांधकाम करणे तसेच सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत रुपये २० लक्ष निधीतून शेगाव येथील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे या विकासकामांच्या भूमीपूजनाची आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी औपचारिकता साधली. यासोबतच शिवनेरी नगर येथील मूलभूत सोयी सुविधांच्या विकास कामांसाठी विशेष अनुदान अंतर्गत रुपये २५ लक्ष निधीतून शिवनेरी नगर सर्व्हे क्रमांक -१९८/१२३ मधील श्री .खिराळे यांच्या घरापासून ते दिलीप कडू यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे या विकासकामांचे आमदार महोदय यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यादरम्यान स्थानिक नागरिकांचे वतीने आमदार- सौ. सुलभाताई खोडके,यश खोडके यांचे स्वागत करण्यासह त्यांचा यथोचित सत्कार सुद्धा करण्यात आला. यावेळी विकासकामांच्या नामफलकाचे अनावरण करीत आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांनी नागरिकांना विकासकामांचे पूर्तता व उपलब्धतेला घेऊन दिलेला शब्द सार्थ ठरवीत क्लीन सिटी अँड ग्रीन सिटी करिता आता नागरी समस्यांचे निराकरण करीत हा मार्ग प्रशस्त करून दिल्याची प्रचिती नागरिकांना आल्याचे चित्र यावेळी दिसून आले.यावेळी यश खोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता-सुनील जाधव,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक-स्वप्नील तालन,माजी नगरसेवक-प्रवीण मेश्राम, रतनदीप बागडे,सुनील धर्माळे,उमेश बीजवे, हर्षल डाहाके,पंकज मुडे,अतुल नागरगोजे, प्रकाश श्रीखंडे,सुरेशकुमार कमनानी,प्रदीप सहारे,गोपाळराव कांडलकर,सुरेश तायडे,रमेश कापरे,स्वप्नील चुडे,राजेश धांडे,प्रवीण कांबळे,विलास राऊत,हर्षल राऊत,दौलतराव इटकरे, धीरज तायडे,गजुभाऊ दातीर, स्वप्नील मोरे,गजानन बायसकर,डॉ. डी. एस. नवाडे,संतोष धापड,अविनाश पांडे,चेतन नेवे,राजेंद्र जायले,राजेश कोरडे,प्रसाद जोशी,अजय सावरकर,सुधीर दाभाडे,महेश चौधरी, संस्कार मैदानकर,रोहित मसराम,केशव बोडखे,पंढरीपंत निकम,गजानन दातीर,हर्षद धांडे,सागर कुकडे,निलेश वानखडे, प्रशांत गजभिये,अमर सवाई, बंडुभाऊ इंगळे,पंडितराव नाईक,परशरामजी कांबळे, प्रमोद सावळे,श्रीकृष्ण पाठक,किशोर गोसावी,प्रवीण बागडे,विनोद फुले,प्रकाश शेलेकर, चंद्रमनी कुलकर्णी, प्रवीण वानखडे,वासुदेव गोरोसे,राहुल कळसकर,लक्ष्मण ठाकरे, पंकज मुडे,खुशाल महल्ले,सुनील चर्जन,सुनील धर्माळे,अंबादास दलाल,संदीप खंडारे,पंकज गोबरे,ऋतुराज राऊत,अभिषेक बोळे, अपर्णा डाहाके, मीनाक्षी दाभाडे,विनिता धर्माळे,रुपाली दातीर,प्रणिता चुडे,शुभांगी धांडे,ज्योत्स्ना बिजवे, नितु मैदानकर,उषा कांडलकर,निला तायडे,प्रमिला निकम,सीमा घवके,रश्मी कांबळे, सरिता प्रसाद,इशाली नागरगोजे, योगिता नागरगोजे,मंदा नागरगोजे,पदमा नवाडे,ज्योती सहारे,सुनीता रसुले,संगीता कुकडे,कांता गोसावी,संगीता भोयर,ताई देशपांडे, दिव्या गुडधे,प्रमिला गुडधे,आशा गोसावी,प्रिया वानखडे,कांता रायबोले,तेजस्विनी सावते, स्नेहा गुडधे,प्राची साबळे,रिमा इंगळे,आकांक्षा सावते,मोनिका करडे,मेघा बागडे,मीना वानखडे, रिना गजभिये, अर्चना वैद्य,अर्चना गोरांसे, रंजना खिराळे, रेखा मुडे,ललिता दलाल,रेखा करडे,शालिनी उगले,आदीसहित अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे