तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाआघाडीचा दणदणीत विजय! (आ. यशोमती ठाकुरचा यांचा गड कायम)

तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाआघाडीचा दणदणीत विजय! (आ. यशोमती ठाकुरचा यांचा गड कायम)

MB-NEWS:- तिवसा सुनिल घोरमाडे (प्रतिनिधी):-दि. २८ एप्रिल रोजी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) च्या सहकार पॅनलने १८ ही जागा बळकावत पूर्णतः विजय संपादन करीत विरोधकांचा सुपडा साफ केल्याचे चित्र आहे..

यामध्ये सेवा सह. मतदार संघातून स्वप्नील केने, विनायक तसरे, विवेक देशमुख, जयकांत माहोरे, गजानन वानखडे, राजेश वेरुळकर, मनोज साबळे, विजयी झाले, तर महिला मतदार संघात मेघा नंदकिशोर गोहत्रे, वंदना राजेंद्र पाटेकर, इतर मा. वर्गीय मधून रवींद्र राऊत विजयी झाले. वि. जा – भ ज मधून मंगेश राठोड . अडते व्यापारी मधून कैलासकुमार पणपलिया, तुळशीराम भोयर तर सर्व साधरण मधून राजेंद्र मडवे, विशाल सावरकर व दुर्बल घटक मधून जितेंद्र बायस्कर. हमाल मापरी मधून मोहन चर्जन असे ऐकून अठराही उमेदवार विजयी झाले.

 

मतदान पूर्वीचा कल गट नेत्या आ. यशोमती ठाकूर यांनी जे भाकीत केले होते ते मात्र पूर्णतः खरे ठरल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले.

या निवडणुकीच्या घवघवीत यशाकरिता सुरेशराव साबळे, अण्णासाहेब दिवे, साहेबराव लासनापुरे, संजय मार्डीकर, शिरीष मोहोड,अरुण बद्रे, दीपकराव सावरकर, सतीश पारधी, अभिजीत बोके, विलासराव माहोरे, दिलीपराव काळबांडे, मुकुंदराव देशमुख, सुरेश भाऊ धवणे, प्रफुल्ल देशमुख, दिलीप भुयार, सौ. कल्पनाताई दिवे, सौ. रोशनीताई पुणसे, रामभाऊ तांबेकर, राधाकृष्ण लढ्ढा, सुरेशराव मेटकर, दिलीप बोके, रामरावजी बोकडे, कमलाकर वाघ, राजेश राऊत, प्रदीप पसलोरे, प्रकाश माहोरे, विनायकराव पाटील, सुभाष भाऊ खारकर, चंद्रशेखर ठाकूर, योगेश वानखडे, गजानन आळसपुरे, शेतु देशमुख, शरद वानखडे, वैभव वानखडे, सत्तार मुल्ला, निलेश खुळे, संदीप आमले, लोकेश केने, संजय ठाकूर, कैलास कठाळे,प्रमोद पांडे, निरंजन कडू, तेजस्वीनी वानखडे, राजकुमार इंगळे, प्रशांत तायवाडे, दिनेश बनारसे, सतीश पोजगे, सुरेंद्र साबळे, सतीश बायस्कर, हेमंत शिरपुरे, दिलीप काळे, नितीन अरडक, गुरुदेव गटरी, रवी हांडे,भारत ढोणे, मंगेश भगोले, रितेश पांडव, प्रदीप बोके,चंद्रकुमार तालन इत्यादींनी अथक प्रयत्न घेतले..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे