तिवसा तालुका बालसंरक्षण समिती चे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची शोध मोहीम

तिवसा तालुका बालसंरक्षण समिती चे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची शोध मोहीम

 

MB-NEWS (तिवसा, प्रतिनिधी)सुनिल घोरमाडे:– महिला व बाल विकास विभाग अंर्तगत जिल्हा बाल सरंक्षण कक्ष अमरावतीचे माध्यमातून जिल्ह्यातील बालकांच्या संदर्भात बेवारस व भटकत असलेले लहान मुले,गरीब कुटुंबा मधील शिक्षणा अभावी वंचित राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करून त्या बालकांचे पुनर्वसन करण्यास मा. जिल्हाधिकारी अमरावती यांनी सर्व तालुका बाल संरक्षण समित्याना प्रत्येक तालुक्यामध्ये सर्वेक्षण करण्याच्या सूचने नुसार तिवसा तालुक्यातील शहरी भागामध्ये पाल,अस्थायी झोपडपट्टीतील तथा रस्त्यावर राहणारे कुटुंबामधील मुलांचे सर्वेक्षण करण्यात येत असुन हलाकीच्या परिस्थितील कुटुंब उदरनिर्वाह करिता भिक्षा मागण्याच्या उद्देशाने शहरी भागामध्ये आलेल्या कुटुंबामधील मुलांचा भिक्षा मागण्याकरिता उपयोग केला जातो अशी मुले शिक्षणापासून वंचीत राहुन ती गुन्हेगारी कडे वळू नये व त्यांना शिक्षण,आरोग्य तसेच इतर शासकीय योजना मिळवुन त्यांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचे माध्यमातुन तालुका बाल सरंक्षण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने रस्त्यावरील राहणाऱ्या बालकांची तिवसा येथे दि.11 मे 2023 ला शोधमोहीम राबवुन कुटुंबातील मुलांची चौकशीअंती सामाजिक तपासणी अहवाल करुण त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे,शोधमोहीमेस तिवसा पंचायत समितीच्या उपसभापती सौ.रोशनी मुकुंद पूनसे, प्रभारी तहसीलदार श्री.नरेद्र कुरळकर, पंचायत समिती चे सहायक गटविकास अधिकारी श्री.हेमंत निवल,बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती चित्रा वानखडे,तालुका संरक्षण अधिकारी श्री.प्रतिक वाघमारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री अजय डबले, श्री. शशांक वैद्य,श्री.आकाश बरवट, जिल्हा बाल संरक्षण कक्ष,अमरावती श्री.ए.पी.चव्हाण, श्री.व्ही.ए. देशमुख तलाठी, तिवसा, श्री.पंकज शिंगारे चाईल्ड लाईन अमरावती ,जिल्हा बाल संरक्षण कक्ष,अमरावती येथील सर्व अधीकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे