दिव्यांगाला घरकुल बांधुन एक मदती साथ देणार प्रहार संघटना
‘‘ सेवा म्हटलं की प्रहार डोळ्या समोर येते.मग तो गरीब असो वा पीडीत मग तिथे जात बघितली नाही किंवा पक्ष.असाच काही अनुभव ‘
MB-NEWS (तिवसा ता.प्र.)नंदकिशोर मते:-तिवसा तालुक्यातील वाठोडा या गावातील दिव्यांग पंकज किसनराव घावडे याचे वडील मरण पावले आई सुशीला किसनराव गावडे ही म्हातारी बायको वनिता पंकज गावडे देखील दिव्यांग तिला बोलता येत नाही यांना आला.
देशाच्या स्वतंत्र प्राप्तीनंतरही या देशातील अनेक नागरिकांना निवाऱ्याची प्रतीक्षा करावी लागते. ज्यांना घरची अत्यंत आवश्यकता आहे जे गरीब आहेत त्यांना अजूनही घरकुला च्या निवाऱ्यासाठी वाट बघावी लागत आहे.
वाठोडा गावातील घावडे कुटुंब घरकुल साठी झगडत असतांना शासनाच्या फेऱ्यात अडकल आज पर्यंत घरकुल न मिळू शकल्याने वाठोडा गावातील प्रहार चे पदाधिकारी प्रवीण केने यांनी घावडे कुटुंबियांना स्व खर्चातून घरकुल बांधून देण्याचा मानस प्रहार कार्यकर्त्यांसमोर मांडला. सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याला होकार देत प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांना भूमीपूजनासाठी आमंत्रित करण्यात आले. त्या अनुषंगाने बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या घरकुल बांधनी च्या भूमीपूजनाला उपस्थिती लावली.
या घरकुल बांधणीच्या भूमीपूजनाला बच्चू कडू, संजय देशमुख,योगेश लोखंडे, गजू कडू,प्रवीण केने,सरपंच रेखा आमले, सुरेंद्र भिवगडे, आशिष बांबल,बादल पाळेकर,माजी सरपंच नरेंद्र काकडे,प्रशांत राऊत,उपसरपंच जाकीर पठाण,बाळा देशमुख ,रीना लोंढे, तुषार धुमनखेडे, अरुण मोहेकर, समशेर बेग,दिनेश अंबलकर,अशोक केने,अमोल मडगे,तुषार निवल, हरिश्चंद्र खारकर,विलास खासबागे,दीपक निवल, चंदन केने ,राजू मोहेंकर ,मंगेश धामणकर,प्रफुल खोडे,दादू खारकर,भूषण खारकर,अनिकेत काळकर, अनिकेत माटे, करण खारकर,अंकुश खारकर,महेश मडगे, प्रवीण खारकर,मंगेश खारकर,राजाभाऊ आमले, निलेश गणोरकर, मारोतराव कुबडे,वसंतराव कुबडे,नशीब पठाण,फैजल बेग,प्रवीण म केने,अंकुश दा खारकर,नरेश गणोरकर,सतीश केने,सुमित केने,अमित केने रमेश हरणे, नितीन हरणे, सानिकेत सपाटे, महेश मडगे, अमोल कोल्हटकर इत्यादी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.

