तिवसा तालुका बालसंरक्षण समिती चे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची शोध मोहीम
MB-NEWS(तिवसा) सुनिल घोरमाडे:- महिला व बाल विकास विभाग अंर्तगत जिल्हा बाल सरंक्षण कक्ष अमरावतीचे माध्यमातून जिल्ह्यातील बालकांच्या संदर्भात बेवारस व भटकत असलेले लहान मुले,गरीब कुटुंबा मधील शिक्षणा अभावी वंचित राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करून त्या बालकांचे पुनर्वसन करण्यास मा. जिल्हाधिकारी अमरावती यांनी सर्व तालुका बाल संरक्षण समित्याना प्रत्येक तालुक्यामध्ये सर्वेक्षण करण्याच्या सूचने नुसार तिवसा तालुक्यातील शहरी भागामध्ये पाल,अस्थायी झोपडपट्टीतील तथा रस्त्यावर राहणारे कुटुंबामधील मुलांचे सर्वेक्षण करण्यात येत असुन हलाकीच्या परिस्थितील कुटुंब उदरनिर्वाह करिता भिक्षा मागण्याच्या उद्देशाने शहरी भागामध्ये आलेल्या कुटुंबामधील मुलांचा भिक्षा मागण्याकरिता उपयोग केला जातो अशी मुले शिक्षणापासून वंचीत राहुन ती गुन्हेगारी कडे वळू नये व त्यांना शिक्षण,आरोग्य तसेच इतर शासकीय योजना मिळवुन त्यांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचे माध्यमातुन तालुका बाल सरंक्षण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने रस्त्यावरील राहणाऱ्या बालकांची तिवसा येथे दि.26 मे 2023 ला शोधमोहीम राबवुन कुटुंबातील मुलांची चौकशीअंती सामाजिक तपासणी अहवाल करुण त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे,शोधमोहीमेस तहसीलदार यांचे प्रतिनिधी श्री. काळीवकर साहेब पंचायत समिती चे गट शिक्षण अधिकारी डॉ.सौ.शिला लोंखडे,बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती चित्रा वानखडे,तालुका संरक्षण अधिकारी श्री.प्रतिक वाघमारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री. शशांक वैद्य हे उपस्थित होते .
जिल्हा बाल संरक्षण कक्ष,अमरावती येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. अजय डबले, विधि तथा परीवीक्षा अधिकारी श्रीमती सिमा भाकरे, बाल संरक्षण अधिकारी श्री. भुषण कावरे, श्रीमती नम्रता कडु, समुपदेशक श्री. आकाश बरवट, लेखापाल श्री. राहुल वैराळे, सामाजिक कार्यकर्ते श्रीमती किर्ती सगणे, मनिषा फुलाडि, माहिती विश्लेषक श्रीमती कांचन ढोके यांचे सहकार्य लाभले

