राजर्षी शाहू विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची १२ वीच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम
MB-NEWS (मंगेश बोबडे)चांदुर रेल्वे-: नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वी (विज्ञान शाखा) च्या परिक्षेत अतुल विद्या मंदिर वर्धा व्दारा संचालीत स्थानिक राजर्षी शाहू विज्ञान व अतुल जगताप कला कनिष्ठ महाविद्यालय, चांदुर रेल्वे ने घवघवीत यश संपादन केले. दि. २५/०५/२०२३ रोजी जाहीर झालेल्या निकालात महाविद्यालयातून एकुण ११३ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यापैकी एकुण ११२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची सरासरी ९९.११ टक्के एवढी आहे. या महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून कु. तन्वी जगताप हीने ८१.१७ टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तसेच मल्हार गायकवाड याने ७५.०० टक्के गुण मिळवून व्दितीय तसेच कु. अनुश्री मोटघरे हीने ६९.०० टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांक प्राप्त केला. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष व प्राचार्य यांनी अभिनंदन केले.

