कुलदीप ढोले यांना राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार
MB-NEWS:-(तिवसा):-अंजनसिंगी अमरावती स्थित राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानतर्फे युवा शेतकरी कुलदीप ढोले (रा. दुर्गवाडा, ता. तिवसा) यांना राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
प्रगतिशील शेतकरी पौर्णिमा सवाई, अध्यक्ष प्रकाश साबळे, ऐनुल्ला खान, अक्षय साबळे यांच्या उपस्थितीत
कुलदीप ढोले यांचा सहकुटुंब स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ, प्रमाणपत्र व राजीव गांधी यांची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. संचालन धर्मदास वाघमारे यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नलिनी चिंचे, साधना ठाकरे, कृषी सखी शालू ढोले, शेतकरी स्वप्निल ठाकरे, अजिंक्य शेंद्रे, प्रशिक ढोले, कोमल बगळे, महेंद्र ढोले, ऋषी डाहे व मित्रपरिवार उपस्थित

