कारगिल युद्धातील नायकाच्या मुलाचा नवा विक्रम.शांततेचा संदेश देण्यासाठी ओमचा 6530 किमी चा प्रवास..ओम हा कर्नल डॉ. राजेश आढावू यांचा मुलगा

कारगिल युद्धातील नायकाच्या मुलाचा नवा विक्रम.शांततेचा संदेश देण्यासाठी ओमचा 6530 किमी चा प्रवास..ओम हा कर्नल डॉ. राजेश आढावू यांचा मुलगा

बारा राज्य व एका केंद्रशासित प्रदेशातून प्रवास

देशासाठी कार्य करण्याचे तरुणांना आवाहन

MB-NEWS रवि कालाने (अमरावती प्रतिनिधी) :- पाकिस्तान विरुद्ध च्या कारगिल युद्धाच्या विजयाला 26 जुलै 2023 रोजी 24 वर्ष पूर्ण होत आहेत या विजयाचा रजत महोत्सव साजरा करण्यासाठी सर्वत्र जय्यात तयारी सुरू असतानाच अवघ्या वीस वर्ष वयाच्या ओम राजेश आढावू या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने तरुणांना शांततेचा व समरसतेचा संदेश देण्यासाठी मोटरसायकल वरून चक्क 6530 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.

ओम आढावू हा कारगिल युद्धातील नायक कर्नल डॉ.राजेश आढावू यांचा मुलगा आहे .डॉक्टर आढावू यांना कारगिल युद्धातील कामगिरीसाठी राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता हे विशेष.
ओम आढावू यांने 19 मे 2023 रोजी दिल्ली येथून आपला प्रवास सुरू केला. बारा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातून हा प्रवास त्याने पूर्ण केला. या प्रवासात त्याने 95 प्रमुख शहरांना भेट दिली . आपल्या प्रवासादरम्यान त्याने अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधला . या संवादातून त्यांनी हरित भारत स्वच्छ भारत आणि शांत भारताचा संदेश दिला . प्रत्येक काम देशाच्या भल्यासाठी करावे असे आवाहन त्याने विद्यार्थ्यांना केले.
ओम प्रवासातून दिल्लीत परतला असता खासदार डॉ.अनिल बोंडे ,आर्मी कमांडर नॉर्दन कमांड आणि कारगिल युद्धाचे नायक लेफ्टनंट जनरल वाय के जोशी , यु वाय एस, एम व्ही आर सी ,एस एम निवृत्त आणि माजी नौदल उपाध्यक्ष सतीश घोडमारे यांनी त्यांचे स्वागत केले.

जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

विविध वैशिष्ट्यांनी नटलेल्या अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात ओम यांना यश प्राप्त झाले.

जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

विविध वैशिष्ट्यांनी नटलेल्या अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात ओम यांना यश प्राप्त झाले .ओम हा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी डॉक्टर वामनराव आढावू यांचा नातू तर कारगिल युद्धाचे नायक डॉक्टर राजेश आढावू यांचा चिरंजीव आहे त्यांच्या या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे