तेजस्विनीताई बोके व भारतीताई बेलूरकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित..
तिवसा(प्रतिनिधी ) सुनिल घोरमाडे:- 31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंतीचे पर्वावर शासन आदेशानुसार ग्रामातील दोन कर्तृत्ववान महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला..
वरखेड येथील ग्रामगीताचार्य सौ. तेजस्विनी अमितराव बोके तथा माणिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. भारतीताई अनिलराव बेलूरकर यांना वरखेड ग्रा.पं. चे वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, आरोग्य सेविका, पुरस्कार निवड समिती सदस्य सह ग्रामतील नागरिक उपस्थित होते.

