चार- पाच महिन्यांपासून मानधन नाही तरीही कर्तव्यतत्पर…आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्ड काढून देतांना संगणक परीचालकांची कसरत
डिजिटल महाराष्ट्राचे सुमारे 22000 शिलेदार, ग्रा.पं. संगणक परीचालकांवर आली उपासमार
MB-NEWS(रवि कलाने) – जिल्हा प्रतिनिधी(अमरावती) :- मुख्यमंत्र्याच्या डिजिटल महाराष्ट्राचे शिलेदार असलेले ग्राम पंचायत चे संगणक परीचालकांचा पगार गेल्या 4 ते 5 महिन्यापासून झाला नसून ते कर्जबाजारी होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे
राज्यात ग्रामपंचायत मध्ये काम करणारे व या डिजिटल युगातील पारदर्शक प्रशासन करण्यामागे मोलाचा वाटा असणारे संगणक परिचालक उपाशी आणि संबंधित कंपनी मात्र तुपाशी अशी वस्तुस्थिती दिसून येत आहे अशातच प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ग्रामपंचायतचे केंद्रचालक उस्फुर्तपणे भूमिका निभावत असून तुटपुंज्या मानधनावर काम करतांना देखील समाजसेवेचे भान जपतो याचे उदाहरण म्हणजे सावंगा वि. येथील केंद्रचालक राहुल सिनकर
यांनी आपल्या कर्तव्याचा उत्तम नमुना देत गावातील एका दिव्यांग व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांनी आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्ड काढून दिले, तर पळसखेड येथील केंद्रचालक रामकृष्ण लटके यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली तरी आपली शारीरिक व्याधी दूर करीत त्यांनी कॅम्प ला हजेरी लावत तब्बल 111 गोल्डन कार्ड काढून दिले, 4-5 महिन्यापासून मानधन मिळाले नाही तरी चालेल पण योजनेचा खरा लाभार्थी योजनेपासून वंचीत राहता कामा नये जणू असच आवाहन केंद्रचालकांनी आपल्या या कृतीतून केले आहे. या कामापासून सर्वांना निश्चितच प्रेरणा मिळाली आहे,तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचविण्यासाठी तत्पर आहेत किंबहुना तितकी सेवा ही ते देत आहेत फक्त माय बाप सरकारने आमची दखल तितकी घ्यावी व किमान वेतन कायद्याच्या कक्षेत आमच्याकडे बघावे हीच आशा केंद्रचालक राहुल सिनकर,रामकृष्ण लटके यांनी व्यक्त केली आहे.
चांदुर रेल्वे तालुक्यात आयुष्यमान योजनेचे गोल्डन कार्ड काढणे याविषयीचे गावपातळीवर कॅम्प सुरू असून या योजनेच्या लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार शासनाने नेमून दिलेल्या दवाखान्यात विशिष्ट आजारावर केल्या जातो यासाठी आरोग्य विभाग व पंचायत समिती यांच्या समन्वयातून गावोगावी कॅम्प घेणे सुरू आहे गटविकास अधिकारी संजय खारकर आपले सरकार सेवा केंद्राचे तालुका व्यवस्थापक विनेश मनोहरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रियंका निकोसे, वैद्यकीय अधिकारी डॉ मंगेश मानकर, वैद्यकीय अधिकारी डॉ सुमित गजभिये, समुदाय आरोग्य अधिकारी निखिल कवडे, आरोग्य सहाय्यक बी डी जेठे, आरोग्य सेविका प्रीती पवार, सर्व आशा,व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक तथा केंद्रचालक परिश्रम घेत आहेत

