बोबदो येथील आदिवासी विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारीनुकतेच रोहित भिलावेकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले

बोबदो येथील आदिवासी विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारीनुकतेच रोहित भिलावेकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले

MB-NEWS.अक्षय अथोटे
मेळघाट चिखलदरा प्रतिनिधी:-

दिं.१५ धारणी तालुक्यातील बोबदो गावातील आदिवासी कोरकूबहूल मेळघाटातील बोबदो या गावातील डॉ. रोहित भिलावेकर यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
त्यांचा शिक्षण १ली ते ४थी वर्गापर्यंत गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा बोबदो व ५वी ते १२वी ते पर्यंतचा शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय धारणी येथे पूर्ण झालं
वडील व्यवसायाने शिक्षक आहे. त्यांचा कडून नेहमी मार्गदर्शन व मेळघाटातील आरोग्यची परिस्थिती बद्दल चर्चा होयची त्यामूळे कूपोषण , मातामृत्यू ,बालमूत्यू ऐकायला मिळायचे त्या सर्व परीस्थिती ऐकून रोहितला नेहमी वाईट वाटच्या त्यामुळे त्यांनी डॉक्टर होयचं ठरवलं,पण नेहमी मार्गदर्शनाची कमतरता भासत होती परंतु वडिलांच्या अपेक्षा आणि मेळघाटातील परिस्थिती बद्दल नेहमी वाचत व ऐकत असलेल्यामूळे मेहनत करत गेला आणि पहिल्या प्रयत्नांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नागपूर ला प्रवेश मिळाला
वैद्यकीय महाविद्यालयात आल्यानंतर नेहमी वाटायचं कि शहराच्या विद्यार्थ्यी स्पर्धा मध्ये सोबत टिकून राहतं येईल कि नाही परंतु मेहनत, जिद्द , आत्मविश्वास ने अभ्यास करत गेला आणि पूर्ण एमबीबीएस कूठलाई अपयश न येता पास झालं त्याचं यश चा श्रेय आई-बाबा व परिवार यांना जातो.त्याचा या यशामुळे सर्व परिवार खूश आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे