मोझरी येथील शेतकरी युवकाची गळफास लावून आत्महत्या.
तिवसा (ता.प्र)नंदकिशोर मते:-तिवसा तालुक्यातील मोझरी येथील शेत शिवारात झाडाला गळफास लावून शेतकरी युवकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.विजय आनंदराव चोपकर वय ४२वर्षे रा.मोझरी असे गळफास घेतलेल्या शेतकरी युवकाचे नाव आहे.
विजय हा काही दिवसांपूर्वी गंभीर आजारी होता.नुकतेच त्याला रुग्णालयातुन घरी आणण्यात आले होते.परंतु गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ रहात असल्याचे सांगण्यात येते.तसेच मंगळवारी सकाळपासून तो घरुन बेपत्ता होता.कुटुंबियांकडुन त्याची शोधाशोध करण्यात आली.
अखेर बुधवारी सकाळी आठ वाजता लगतच्या शेतकऱ्याला शेताच्या बांधावरील झाडाला मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला.तेव्हा घटनेची माहिती तिवसा पोलिसांना देण्यात आली.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी तिवसा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. पुढील तपास तिवसा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

