अमरावती येथे २४जुनला शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रशिक्षण… सामुहिक कृतीसाठी संस्थात्मक दृष्टिकोन मजबूत करणे

अमरावती येथे २४जुनला शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रशिक्षण… सामुहिक कृतीसाठी संस्थात्मक दृष्टिकोन मजबूत करणे

MB-NEWS तिवसा ता.प्र.नंदकिशोर मते:
अमरावती येथे शेतकरी संस्थांना (FPOs)बळकट आणि प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नात “स्विच ऑन फाऊंडेशन”ने शेतकरी उत्पादक कंपनी यांना समोर येणाऱ्या प्रमुख आव्हानांना तोंड देण्याच्या उद्देशाने व्यावसायिक प्रशिक्षण सत्रे आयोजित केली.परस्परसंवादी प्रशिक्षण कार्यक्रमाने द्त्तापुर्णा कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड,चांदुर बाजार आणि ईलीचपुरा सातपुडा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, अचलपूर येथील शेतकरी उत्पादक कंपनी एकत्र आणले.
या कार्यक्रमात उपस्थित श्री.उज्जल आगरकर-नोडल अधिकारी,स्मार्ट प्रकल्प, श्री.निलेश राठोड -पुरवठा मुल्य साखळी तज्ञ,पंकज काळे, सेंद्रिय शेती तज्ञ,राहुल मानकर ,भुजल व हवामान तज्ञ,विनय जाजू,एम डी स्विच ऑन फाऊंडेशन,गौरव खुळे, प्रकल्प व्यवस्थापक, स्विच ऑन फाऊंडेशन,सुमंत बोंडे, प्रकल्प व्यवस्थापक स्विच ऑन फाऊंडेशन, गौरव वने, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्विच ऑन फाऊंडेशन,ईलीचपुरा सातपुडा शेतकरी उत्पादक कंपनी, अचलपूर व दत्तापुर्णा कृषी शेतकरी उत्पादक कंपनी, शहापूर यांचे सर्व संचालक, अध्यक्ष व कर्मचारी वृंद उपस्थित होते.संचालन कर्ता प्रमोद पातूर्डे व आभार सुमंत बोंडे यांनी मानले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे