राज्यातील स्वस्त वाळूचे डेपो ‘इतक्या’ दिवसांत सुरू होणार? मिळणार ६०० रू प्रती ब्रास वाळू..

राज्यातील स्वस्त वाळूचे डेपो ‘इतक्या’ दिवसांत सुरू होणार? मिळणार ६०० रू प्रती ब्रास वाळू..

 

राज्यामध्ये सुधारित वाळू / रेती धोरण तयार करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच दिले आहेत. सुधारित वाळू धोरणासंदर्भात सद्य:स्थितीचा विभागनिहाय आढावा काल (6 जुलै) मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, सुधारित वाळू/रेती धोरणामुळे लोकांना प्रती ब्रास ६०० रुपये एवढ्या स्वस्त दराने वाळू मिळाली पाहिजे. अनधिकृत वाळू उपसा आणि अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे, असा या नव्या धोरणाचा उद्देश आहे. या धोरणामुळे महसूल स्वरूपात स्वामित्व धन (रॉयल्टी) म्हणून वर्षाला जी रक्कम मिळत होती, ती आज महिन्याला मिळत आहे. सामान्य लोकांना या धोरणाचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील डेपोची तपासणी करून तत्काळ इतर सर्व वाळू डेपो कार्यान्वित झाले पाहिजेत, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

रेती घाट चालू होण्यासाठी पर्यावरण विभागाच्या अनुमती अभावी काही घाट प्रलंबित आहेत. त्याबाबत तातडीने कार्यवाही करून रेती घाट चालू करण्यात यावे. काही ठिकाणी जलसंपदा विभागाचे सहकार्य आवश्यक आहे. याबाबत संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून अडचणी दूर कराव्यात. असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील सर्व जिल्ह्यांतील डेपोंची तपासणी करून पुढील 15 दिवसांतच सर्व डेपो चालू झाले पाहिजेत, असे निर्देशही नुकत्याच झालेल्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. रेती घाट चालू होण्यासाठी पर्यावरण विभागाच्या अनुमतीअभावी काही घाट प्रलंबित आहेत, त्याबाबत तातडीने कार्यवाही करून रेती घाट सुरु करण्यात यावे, असेही ते म्हणाले.

तर काही ठिकाणी जलसंपदा विभागाचे सहकार्य आवश्यक आहे, याबाबत संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून अडचणी दूर कराव्यात आणि अनधिकृतरित्या वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, याशिवाय वाळू धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांपैकी 33 अधिकारी अजूनही रुजू झालेले नाहीत, याबाबत विभागीय आयुक्त यांनी संबंधित अधिकारी यांना तातडीने हजार होण्याबाबत नोटीस जारी करावी. सर्व अधिकाऱ्यांनी त्वरित हजर व्हावे, असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे