ग्रामगीता प्रचारक बाबारावजी पुनसे यांचे देहावसान

ग्रामगीता प्रचारक बाबारावजी पुनसे यांचे देहावसान

MB-NEWS (तिवसा): तालुक्यातील वणी ममदापूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचे प्रचारक तथा वणी ममदापूर गावचे माजी सरपंच बाबारावजी पूनसे यांचे अल्पष्या आजाराने निधन.
त्यांना पुढील उपचारार्थ अमरावती येथून Midas Multispeciality Hospital Nagpur येथे घेऊन जात असातांना गुरुकुंज मोझरी येथेच ११ जुलैच्या मध्ये रात्री १.वाजताच्या सुमारास वयाच्या ७२ व्यावर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बाबारावजी पुनसे यांनी चाळीस वर्षांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यास आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.असून राष्ट्र जागृतीच्या मोहीमे दरम्यान व.राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रचार प्रसार करत राष्ट्रजागृती,समाज प्रबोधन,अनिष्ट रूढी परंपरा यावर प्रबोधन केले तसेच सन २००३ चे दरम्यान शिवसेनेच्या संघर्ष यात्रे मध्ये सहभागी होऊन महाराष्ट्रभर राष्ट्रसंताच्या विचारातून समाज जागृती केली.त्यांची अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळाचे सच्चे निष्ठावंत,निस्वार्थ वृत्तीने प्रचारक म्हणून सर्वदूर वोळख होती.तसेच ते गावचे सरपंच असतांना गावविकासा करिता त्यांचे उल्लेखनीय कार्य होते.

ते तिवसा पंचायत समितीच्या उपसभापती सौ.रोशनी पूनसे यांचे सासरे तर वणी ममदापूरचे माजी सरपंच मुकुंद पूनसे यांचे वडील होते.

आज (ता. ११) दुपारी दोन वाजता ममदापूर येथील मोक्षधाम मध्ये
त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक तसेच गुरुदेव सेवामंडळाचे प्रमुख पदाधकारी उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून, नातवंड असा परिवार आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे