शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; बियाणे, खते, कीटकनाशके यासंदर्भात तक्रारीसाठी व्हॉट्स ॲप क्रमांक येणार
👉 खते, बियाणे अथवा किटकनाशके यासंदर्भात तक्रार करण्यासाठी राज्य सरकारमार्फत लवकरच व्हॉट्स ॲप क्रमांक जारी करण्यात येणार आहे._
👉 याबाबतची पावले उचलली जात आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत आज त्यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा आढावा घेतला. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते._
_👉 या बैठकीला अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

