मनोहर भिडे यांच्या वक्तव्याविरोधात अमरावतीत संतापाची लाट; काँग्रेसचे जोरदार आंदोलन

मनोहर भिडे यांच्या वक्तव्याविरोधात अमरावतीत संतापाची लाट; काँग्रेसचे जोरदार आंदोलन

MB – NEWS (अमरावती ):-मनोहर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात अमरावतीत काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन केल्या गेले . तर अमरावती काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करताना भिडे यांना अटक करा, अशी मागणी केली आहे.

अमरावती, 31 जुलै 2023 मनोहर भिडे यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. विविध जिल्ह्यात काँग्रेसकडून आंदोलने केली जात आहेत. तर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात अमरावतीत काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जात आहे. तर अमरावती काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करताना भिडे यांना अटक करा, अशी मागणी केली आहे. भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण तापले होते. दरम्यान त्यांनी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसने जोरदार आंदोलन केले . यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते नेते हे आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात सहभागी झाले होते.
जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलुभाऊ देशमुख, अमरावती शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, आमदार बळवंत वानखडे, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर, प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव हरिभाऊ मोहोड, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, हरिष मोरे, पंदाबराव वानखडे, सुनिल वांगे,प्रविण मनोहर, महिला कॉंग्रेस अध्यक्ष अंजली ठाकरे, पंकज देशमुख, शैलेष काळबांडे, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, अमित गावंडे, श्रीकांत बोंडे, रमेश काळे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश गुहे, रितेश पांडव, वैभव वानखडे, राजेश वानखडे, राजा बांगडे,सुजाता झाडे, अंजली ठाकरे, अंकुश जुनघरे, सौरभ किरकटे, पवन काळमेघ, अंकुश बनसोड, प्रदिप शेंडे, उमा अंबलकर, बाळासाहेब ठाकरे, गजानन तायवाडे यांच्यासह अमरावती जिल्हाभरातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे