अनंत पोलाड यांची काँग्रेस सोशल मीडिया विधानसभा अध्यक्षपदी निवड…
MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)चांदूर रेल्वे : नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया विदर्भ विभागाची बैठक विशाल मुत्तेमवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी सोशल मीडिया धामणगाव रेल्वे विधानसभा अध्यक्ष म्हणून अनंत पोलाड यांची पुन्हा निवड करण्यात आली.
अनंत पोलाड यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये देश की धरोहर या सिरीजचा संपूर्ण विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. या कार्याची दखल घेत सोशल मीडियाचे राज्य अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी अनंत पोलाड यांची पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून निवड केली.

