मुंधडा महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात संपन्न डॉ. अलका करणवाल यांनी विद्यार्थ्यांना दाखविला क्रिडा विभागाचा लघुचित्रपट

मुंधडा महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात संपन्न

डॉ. अलका करणवाल यांनी विद्यार्थ्यांना दाखविला क्रिडा विभागाचा लघुचित्रपट

MB NEWS(चांदूर रेल्वे) -चांदूर रेल्वे शहरातील स्व. मदनगोपाल मुंधडा कला, वाणिज्य आणि विज्ञान, अशोक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ महाविद्यालयातील क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे यांनी भूषविले तर व्यासपीठावर प्रा. डॉ. अलका करणवाल, प्रा. संजय गवई, प्रा.तपोविन पाटिल, प्रा. श्याम कारमोरे आदी स्थानापन्न होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अलका करणवाल यांनी करून मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यामध्ये १९५६ मध्ये ध्यानचंद सिंह यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते व त्या वर्षापासून त्यांच्या वाढदिवसाला ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो असे सांगितले. याशिवाय डॉ. करणवाल यांनी सन २०२२-२३ मध्ये क्रीडाक्षेत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश कथन केले व प्राचार्यांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोकराव ध्यानचंद यांचे फोटो विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. तसेच डॉ. अलका करणवाल यांनी क्रीडा विभागाविषयी प्रगती पथाचे लघुचित्रपट दाखवून विद्यार्थ्यांना खेळाविषयी प्रेरीत केले. प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मैदानी खेळाचे महत्त्व, शारीरिक व मानसिक विकासाने आजची पिढी आपले करिअर कसे बनवू शकतात याविषयी मार्गदर्शन केले. यादरम्यान प्रा. तपोविन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी सुध्दा खेळाविषयी आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्राध्यापक वर्ग व इतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. स्नेहा मोरे ,आभार प्रदर्शन प्रा. संजय गवई ( वाणिज्य विभाग प्रमुख) यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगिताने करण्यात आला. सदर नियोजनबध्द कार्यक्रमाची उपस्थितांनी प्रशंसा केली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे