सचिन तेंडुलकर घरासमोर बच्चू कडू आक्रमक
MB NEWS (मुंबई ब्युरो.):- ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करणाऱ्या सचिन तेंडुलकरने भारतरत्न पुरस्कार परत करावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. कडू यांच्यासोबत प्रहारचे कार्यकर्ते आज मुंबईत सचिनच्या घरासमोर
आक्रमक झाले.
पोलिसांनी कडू यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रहारच्या कार्यकर्ते यांनी सचिन विरोधात घोषणाबाजी केली.

