आदिवासी मुलाची पुकार..! प्रा. अनिता संजय धुर्वे,महिला कला वाणिज्य महाविद्यालय चांदुर रेल्वे, जि. अमरावती

आदिवासी मुलाची पुकार..!
प्रा. अनिता संजय धुर्वे,महिला कला वाणिज्य महाविद्यालय चांदुर रेल्वे, जि. अमरावती

शिवम उईके बारा वर्षाचा मुलगा आश्रम शाळेत मृत पावला आश्रम शाळेत शिक्षण घेणे पाप आहे का…स्वतःची प्रगती करणे शाप आहे का…

मी पहिलीत जेव्हा आश्रम शाळेत जातो
सहा वर्षाचा चिमुकला सोडून कुटुंबाला आश्रम
शाळेत राहतो..फक्त शिक्षणासाठी दर दर भटकतो…..

असे कितीतरी आश्रम शाळेत मुला-मुलींसोबत होतो छळ,कधी होते बलात्कार, तर कधी देतात मानसिक यातना याचा आवाज उठवणे पाप आहे का…जिथे घर तिथे शाळा नाही जंगलात डोंगरात राहते मी धड चालायला रस्ते नाही विचार करतो मी शिक्षण घेऊन समाजाचा प्रगती करेन असा विचार करणे शाप आहे का.

खूप कष्ट करतात आई-बाबाआम्हाला ठेवतात आश्रम शाळेत विचार करतात आमच्याबद्दल जेवला की नाही, झोपला की नाही त्यांची किंमत काहीच नाही का….

घरी खायला नाही अन्न राहायला नाही घर
घालायला नाही कपडे शिकायला नाही पैसे
म्हणून मला शिक्षणाचा अधिकार नाही का….

माझ्या गावाच्या प्रगतीसाठी अनेक संस्था काम करतात
आमची तर प्रगती होत नाही स्वतःची प्रगती करून घेतात
आजार झाला तर दवाखाना नाही मग आम्ही जगायचं कसं हे विचार करणे पाप आहे का…

देशाला स्वातंत्र मिळून ७६ वर्षे झालीत अमृत महोत्सव साजरी करतो बारा वर्षात माझा मृत्यू होतो
ही लाजिरवाणी बाब नाही का…

चंद्रावर पोहोचलो, सूर्या जवळ जात आहोत शिक्षण माझ्यापर्यंत पोहचेल कधी कशाला म्हणतात खरी प्रगती
जिथे जीव आहे त्याचा विचार नाही…असे विचार असणे योग्य आहे का…

मी पण भारताचा वंश आहे मला शिक्षणाचा अधिकार नाही का माझ्या जीवनाचा मूल्य काय आहे
मला जगण्याचा अधिकार नाही का…. जगण्याचा अधिकार नाही का…..

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे