पत्रकार मोहन राऊत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्याच्या अवर सचिवाच्या हस्ते वितरण
MB NEWS(धामणगाव रेल्वे):–मागील २५ वर्षा पेक्षा अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रीडा विविध विभागात आपल्या लेखणीतून आगळा- वेगळा ठसा उमटविणारे सर्व सामान्य व आदिवासींना न्याय देण्याचे काम करणारे धामणगाव रेल्वे येथील पत्रकार मोहनभाऊ राऊत यांना राज्याचे अवर सचिवाच्या हस्ते मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज रविवारी नागपुरात देण्यात आला आहे.
धामणगाव तालुक्यातील रहिवाशी असलेले पत्रकार मोहन राऊत हे दोन तपा पेक्षा अधिक काळापासून पत्रकरिता क्षेत्रात कार्यरत आहे शासनाच्या विविध योजनेची अंमलबजावणी होतांना सर्व सामान्य माणसाला कितपत लाभ मिळतो यांचे वृत्तपत्रातून अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लिखान ते करतात तसेच समाजातील अनेक प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचे काम त्यांनी केले.जनतेमधील विकास विषयक जाणिवाच्या जागृतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे त्यांना यंदाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्र भूषण पुरस्कार समता साहित्य अकादमीच्या वतीने राज्याचे अवर सचिव नंदकुमार राऊत यांच्या हस्ते स्मृती चिन्ह सन्मानपत्र देण्यात आला. यावेळी नवी दिल्ली जे. एन. यु.च्या विभाग प्रमुख डॉ विमल थोरात,डॉ डी. एस. तांडेकर, मोहन राऊत यांच्या पत्नी मीनाक्षी राऊत मुलगी मधुरा राऊत यांची उपस्थिती होती

