समृध्दी मार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे.भीषण अपघातात एकाचा मृत्यू
MB NEWS (ब्रेकिंग):-समृध्दी मार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. वाशिमच्या वनोजा कारंजा येथे समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वन्यप्राणी रस्त्यावर अचानक आल्याने त्याला कारची जोरदार धडक बसली.
दुरतकर कुटंब हे गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला निघाले असतानाही ही दुर्देवी घटना घडली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

