महिला महाविद्यालयात पोषण माहनिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.
MB NEWS 365(महाराष्ट्रातील बातमी)चांदुर रेल्वे:- दि. २९ विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित महिला कला वाणिज्य महाविद्यालय चांदुर रेल्वे येथील राष्ट्रीय सेवा योजना व गृहअर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माहनिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातून पोषण आहारविषयी जनजागृती केली जाते.
आज पोषणाविषयी योग्य माहिती नसल्याने गरोदर माता, किशोरवयीन मुले-मुली यांना अनेक प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागते. याचेच औचित्य साधून महाविद्यालयाच्यावतीने महाविद्यालयीन विद्यार्थीनीं व समाजात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्यामध्ये हिमोग्लोबिन तपासणी, पोषण आहारविषयी मार्गदर्शन कार्यक्रम, पोषण विषयी सामान्य ज्ञान स्पर्धा, ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप, पोषण रॅली, डीस डेकोरेशन, आनंद मेळावा, पोषण सुंदरी स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.
स्पर्धामध्ये कडधान्यापासुन राखी मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतीक्षा धोटे बी. ए. द्वितीय, द्वितीय क्रमांक सायली ठोमरे बी. ए. द्वितीय, तृतीय क्रमांक निर्जला वासनिक बी ए. तृतीय तर सामान्यज्ञान स्पर्धेत मुस्कान शाह बी. ए. द्वितीय, द्वितीय क्रमांक राजश्री पांडे बी.ए प्रथम, तृतीय क्रमांक श्रेया वाघमारे बी. ए. तृतीय तसेच पाक कला स्पर्धेत प्रथम क्रमांक राणी माने बी. ए प्रथम, द्वितीय क्रमांक हर्षदा मसराम द्वितीय बी. ए. प्रथम, तृतीय क्रमांक हर्षा दिलीप बावनथडे बी. ए. प्रथम आणि पोषण सुंदरी स्पर्धेत प्रथम क्रमांक मुस्कान शाह बी. ए. द्वितीय, मोनिका रोकडे द्वितीय बी.ए प्रथम, तृतीय क्रमांक कु. प्रतीक्षा धोटे बी. ए. द्वितीय व प्रोत्साहन पर बक्षीस राजश्री पांडे बी. ए प्रथम यांनी पटकाविले. सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर यांच्या मार्गदर्शनात तर डॉ. सीमा जगताप, डॉ. विजय कापसे, डॉ. प्रदीप दंदे, प्रा. संजीव भुयार यांच्या उपस्थितीत पार पडले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. सुषमा मावंडे ग्रंथपाल अशोक कॉलेज चांदुर रेल्वे व प्रा. रुपाली इंगळे अशोक कॉलेज चांदुर रेल्वे यांनी परीक्षण केले.
या कार्यक्रमाचे आयोजन गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनिता एस. धुर्वे यांनी केले. तर प्रा. नीलिमा थोरात, प्रा. रश्मी खेडकर, प्रा मृणाली वानखेडे, प्रा. नीलिमा टिचुकले, रेखा मेश्राम, रजनी वघवे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.

