ग्रामपंचायतला युवा आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते झाला पुरस्कार प्रदान.तालुक्यातील उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामपंचायतींना उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला.
MB NEWS महाराष्ट्रातील बातमीपत्र (चांदुर रेल्वे):-
महाआवास अभियान- ग्रामीण’ अभियानातंर्गत रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण, शबरी आवास योजना अशा विविध घरकुल योजनेतून घरकुल निर्मितीला गती देण्याचे आवाहन आमदार प्रतापदादा अडसड यांनी केले. सन २२-२३ मधील महा आवास अभियान अंतर्गत चांदुर रेल्वे तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पंचायत समिती कार्यालय चांदुर रेल्वे येथे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती प्रशांत भाऊ भेंडे, माजी पंचायत समिती सभापती सरिताताई देशमुख, भाजपा चांदूर रेल्वे तालुका अध्यक्ष बबनरावजी गावंडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी, संजय खारकर विस्तार अधिकारी श्री चव्हाण, प्रशासन अधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी चांदूर रेल्वे तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राजुरा, दहेगाव धावडे, सातेफळ, मालखेड, कळमगाव, तालुक्यातील उत्कृष्ट काम केल्याबद्दल वरील ग्रामपंचायतींना उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत मधील सरपंच सचिव ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

