माविआ ने महाराष्ट्राची माफी मागावी. बाभुळगाव भाजपाच्या वतीने माफी मांगो आंदोलन.

माविआ ने महाराष्ट्राची माफी मागावी. बाभुळगाव भाजपाच्या वतीने माफी मांगो आंदोलन.

MB NEWS (महाराष्ट्राची बातमीपत्र)समिर शिंदे:- भाजपा बाभुळगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने दिनांक २१ रोजी स्थानिक बस स्थानक चौकात सकाळी ११चे सुमारास महाविकास आघाडी सरकार विरोधात माफी मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी कंत्राटी भारतीचे महापाप करणारे,उध्दव ठाकरे,शरद पवार व नाना पटोले व मा.वी.आ ने महाराष्ट्र ची नाक घासून माफी मागावी अशा आशयाचे फलक दाखवीत निषेध नोंदविण्यात आला.तसेच माफी मांगो,माफी मांगो उध्दव ठाकरे माफी मांगो अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या.

या आंदोलनास राळेगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख.भाजपा तालुका अध्यक्ष सतीश मानलवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश भुमकाळे, भा.ज.यू .मो.तालुका अध्यक्ष नितीन परडखे,भाजपा शहर अध्यक्ष अनिकेत पोहोकार, विवेक परडखे ,डॉ.प्रभाकर जी रुंदे माझी तालुका अध्यक्ष चुडामन मदारे ,कीशोर दामेदर,अजय वाकेकर ,महिला तालुका अध्यक्ष सौ.नीलिमा आजमिरे, सरपंच गजानन कैकाडे, निरंजन लांबे,मुकुंद गोडे, विवेक बुरेवार,सोनु भाऊ येंडे,चंद्रशेखर अलोने,मयुर पिसे ,संकेत मोटके,स्वप्नील लांडगे, गीतानंद बनकर,अमन इंगोले ,अमोल अजमिरे, वाटमोडे,संदीप कदम,अक्षय शेळके,संजय खोडे , सांचल राणे ,सोनु शर्मा ,सतीश मेघे यांचेसह इतर पदाधिकारी,बूथ प्रमुख ,शक्ती केंद्र प्रमुख तथा सर्व आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे