तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील अनोळखी वाहनाच्या धडकेत 41 वर्षीय इसमाचा मृत्यू..

तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील अनोळखी वाहनाच्या धडकेत 41 वर्षीय इसमाचा मृत्यू..

MB NEWS :-सुनिल घोरमाडे (तिवसा):-तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील अनोळखी वाहनाच्या धडकेत 41 वर्षीय इसमाचा मृत्यू* राष्ट्रीय महामार्ग क्र.6 लालासाहेब देशमुख कॉलेज समोरील घटना। तिवसा शहरा पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या लालासाहेब देशमुख कॉलेज समोर आज दी.27 रोजी दुपारी 2.30 वाजता दुर्दवी घटना घडली.भरधाव येणाऱ्या अनोडखी वाहणाने दुचाकी स्वारास जबरदस्त धडक दिल्याची घटना घडली.या घटने मध्ये 41 वर्षीय दुचाकी स्वारास घंबीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीच्या खासगी दवाखान्यात नेण्यात आले.डोक्याला जबर मार असल्यामुळे त्यांना तातडीने नागपूर ला हलविण्यात आले पण त्याचा वाटेतच मृत्यू झाला.त्या व्यक्ती चे नाव राजेश मनोहर चवडे रा.तळेगाव ठाकूर आहे.तिवसा वरून आपल्या गाडीने एम एच एक्स 4432 क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या गावी तळेगाव ठाकूर ला जात होते पण लालासाहेब कॉलेज पाशी अनोडखी वाहनानाने जबर धडक दिली.

हा अपघात इतका जबर होता की यामध्ये श्री.चवडे यांना डोक्याला घंबीर दुखापत झाली.काही वेळ लालासाहेब कॉलेज पाशी रक्तस्त्राव मध्ये पडून होते.पण गावातील व्यक्ती सुधीर काळे यांनी ऑटो मध्ये टाकून त्यांना तिवसा उपजिल्हा दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.त्यांना ज्यास्त मार असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात सांगितले.मात्र डोक्याला जबर मार असल्या मुळे नागपूर ला नेण्यास सांगितले.पण त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.यावेळी घटना स्थळी तिवसा पोलिसांनी पंचनामा करून नोंद घेतली.पुढील तपास तिवसा पोलीस स्टेशन करत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे