राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ला नँक चा ‘अ ‘ दर्जा प्राप्त

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ला नँक चा ‘अ ‘ दर्जा प्राप्त

MB NEWS(महाराष्ट्रातील बातमीपत्र):-स्थानिक चांदुर रेल्वे येथील राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ला 18 व 19 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय मूल्यांकन ‍आणि अधिस्वीकृती परिषद अर्थात नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडेशन कौन्सिल (NAAC) समितीने भेट दिली. सदर संस्था उच्च शिक्षण आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनास मान्यता देते. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी सर्वपरिचित अशा या महाविद्यालयाची मूल्यांकनाला समोर जाण्याची ही दुसरी वेळ होती. त्रिसदस्य समिती सदस्यांनी महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. या भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयातर्फे राबविला जाणाऱ्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाविद्यालयाला A दर्जा CGPA: 3.01 दिला.

अतुल ‍विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्षा प्रा. सौ उत्तराताई जगताप, उपाध्यक्षा डॉ. सौ वैष्णवीताई जगताप, सचिव प्रा. डॉ. वीरेंद्र भाऊ जगताप आणि कोषाध्यक्ष श्री. परीक्षित जगताप यांनी या श्रेणीबद्दल समाधान व्यक्त केलेले आहे व प्रभारी प्राचार्य डॉ एम. पी. चिखले, समन्वयक डॉ. मीनल जे. केचे व तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे भरभरून कौतुक केले या यशाबद्दल बोलताना प्रा. सौ. उत्तराताई जगताप यांनी हे यश महणेज संघटित व एकत्रितपणे केलेल्या परिश्रमाचे फळ असल्याचे मत व्यक्त केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे